सामाजिकजळगांवराजकीय

अचानक रद्द झाल्या रेल्वेगाड्या, खा. वाघ, आ.भोळे यांच्या प्रयत्नांनी मिळाली “एक्स्प्रेस” !

विद्यार्थ्यांसह प्रवाश्यांनी आभार मानत काढले फोटो

खान्देश टाइम्स न्यूज l १३ सप्टेंबर २०२४ l जळगाव l अचानक रेल्वेगाड्या रद्द झाल्याने १५० ते २०० प्रवाशांचे पाचोरा, चाळीसगाव जाण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे खा. स्मिता वाघ व आ. राजूमामा भोळे यांनी तत्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून विद्यार्थ्यांना रेल्वे उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी आभार मानले.

मुंबईहून जळगांवकडे येत असताना खा. स्मिताताई वाघ व आ. राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगांव रेल्वे स्टेशनला उतरले त्यावेळी रेल्वे स्टेशनवर रोज ये-जा करणारे नोकरदार वर्ग तसेच कॉलेजची मुलं मुली विद्यार्थ्यांची परीक्षा होती. त्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांना माहिती दिली की आज भुसावळ-इगतपुरी ७:१५ वाजताचा मेमो अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केला.

आम्ही सर्व १५० ते २०० प्रवाशांना आता पाचोरा-चाळीसगाव जाण्यासाठी एकही गाडी नाही. तेव्हा खा. स्मिताताई वाघ यांनी डीआरएम भुसावळ यांच्या सोबत बोलण करून गाडी नंबर २२१८४ साकेत सुपर फास्ट एक्सप्रेसला जळगांव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देऊन पुढील पाचोरा, चाळीसगाव स्टेशनला पण थांबा देण्याचे निर्देश दिले. त्यावेळी सर्व विद्यार्थिनी व प्रवाश्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांचे आभार मानले. अनेक मुलांना खा. स्मिता वाघ व आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत त्याठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button