बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
धरणगाव/जळगाव l ०४ ऑक्टोबर २०२४ l मधून राजमाता जिजाऊ चौक सुशोभिकरण साठी 10 लक्ष तर वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत अमळनेर रस्त्यावर क्रांतीसुर्य महाराणा प्रताप प्रवेशद्वार उभारणार असल्याचे सांगून 14 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच उभारणार आहे. मराठा समाजाच्या एकत्रिततेसाठी आणि सांस्कृतिक जतनासाठी हे कार्यालय मोठे योगदान देऊ शकते. या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून समाजाच्या एकात्मतेला बळ मिळू शकते. बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे मराठा समाज प्रबोधिनी आयोजित मराठा समाज बहुउद्देशीय सभागृह भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.
अध्यक्षीय भाषणात खा. स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाती – पातीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना सतत महत्व दिले आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात विकास कामांचा झंझावात निर्माण केला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठा समाज प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. डी. पी. पाटील यांनी मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहासाठी 50 लाखाचे निधी दिल्याबद्दल धन्यवाद देवून सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन सचिव आर. डी. पाटील यांनी केले. आभार डी डी पाटील सर यांनी मानले.
याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, जे.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संजय पवार, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, संजय पाटील सर, धनराज पाटील, ज्ञानेश्वर महाजन, प्रेमराज पाटील, सचिन पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाजपाचे सुभाष देवराम, सी. के. पाटील, भानुदास विसावे, जीवन आप्पा बयास, शहर प्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, विजू महाजन, जिजाबराव पाटील, किशोर पाटील, रविंद्र चव्हाण सर, भानुदास विसावे, मराठा समाज प्रबोधिनीचे पदाधिकारी, संचालक निळकंठ पाटील, गुलाबराव मराठे, मोहन पाटील, राहुल पाटील प्रा. किरण पाटील, आनंदा पवार, गोविंदा पवार, राजेंद्र गांगुर्डे, सुनिल चौधरी, रोहिदास पाटील, मोहन पाटील, विजय पवार, महेश पाटील, वाल्मीक पाटील, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.