खान्देश टाइम्स न्यूज ।११ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ झालेले अवैध गॅस भरणा स्फोट प्रकरणनंतर सर्वत्र टीका होत असल्याने एमआयडीसी पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्णी लावण्यासाठी अनेकांनी जुगाड लावला होता मात्र संदीप भटू पाटील यांची वर्णी लागली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. इच्छादेवी चौकाजवळ महामार्गलगत अवैध गॅस भरणा करताना स्फोट झाला होता. घटनेत ७ लोकांना जीव गमवावा लागला होता. घटनेनंतर तत्काळ २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. दरम्यान, घटनेची व्याप्ती आणि होत असलेली टीका लक्षात घेता पोलीस अधिक्षकांनी निवडणूक आटोपताच मोठा निर्णय घेतला होता..
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केल्यानंतर दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी नवीन आदेश जारी केले असून जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक संदीप भटू पाटील यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीसाठी काही अधिकारी इच्छूक होते मात्र संदीप पाटील यांनी बाजी मारली आहे.