जळगाव प्रतिनिधी ;-अल्पसंख्याक दिनानिमित्त मुस्लिम सेवाभावी संस्था आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणाऱ्या लोकांना अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित करून मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी शासनाने प्रयत्न करत अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कीसध्याच्या काळात विशेषतः पोलिस खाते, शिक्षण विभाग, महसूल विभाग, राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाज संख्याच्या तुलनेत सर्वाधिक मागासलेला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या प्रगतीसाठी पुढे नेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देतांना भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चा महानगराध्यक्ष अशफाक मुनाफ खाटीक, सरचिटणीस जावेद सलिम खाटीक, सरचिटणीस मोसीन शाह, चिटणीस शाहीद मजीद शेख, शाकीर शेख, जाकीर पठाण, इमरान कुरेशी, वसीम कुरेशी,नईन सैय्यद, सलीम गुलाम अली. आदी उपस्थित होते.