समर्पण करायला लावणारा फुटबॉल -डॉ. केतकी पाटील
जळगाव l २५ जुलै २०२३ l क्रीडा शिक्षकांनी केलेल्या सूचना अंमलात आणल्या तर शरीराची घडण होईल अफाट लोकप्रिय असलेल्या क्रिकेटच्या पलीकडे ही भरपूर खेळ आहेत.खेळ कोणताही असो त्यात तुम्ही असणे महत्वाचे आहे कारण या खेळाला तुम्ही वैश्विक बनवू शकतात. शरीराची ठेवण घडवणारा संपुर्ण समर्पण करायला लावणारा फुटबॉल खेळ आहे, भारतात जगप्रसिध्द फुटबॉल पटू तुमच्या रूपात घडू शकतील या खेळात तुम्ही समर्पण दयावे असे आवाहन डॉ. केतकीताई पाटील यांनी जळगाव येथील क्रीडा संकुलात १७ वर्षांखालील मुलांच्या शालेय सुब्रोतो फुटबॉल चषक च्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर मिलिंद दीक्षित क्रीडा अधिकारी, फारूक शेख, अनिता कोल्हे, अॅड आमिर शेख, गोपाळ जोनवाल, सुजाता गोलाणे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.केतकीताई पाटील यांचे स्वागत मिलिंद दीक्षित व अनिता कोल्हे यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत २६ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना काशिनाथ पलोड विद्यालय व सेंट अलायसेस विद्यालय भुसावळ मध्ये खेळला गेला. यात सेंट अलायसेस विद्यालयाने चषक जिंकला. विजेत्या व उपविजेत्या टीमला डॉ.केतकीताई पाटील व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली. १७ वर्षांखालील बियाणी विद्यालय भुसावळ व बोहरा सेंट्रल पारोळा मुलांच्या संघाच्या फुटबॉल सामन्याचा टॉस (नाणेफेक) डॉ. केतकीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.