जळगाव l २४ जुलै २०२३ l युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराजजी कावडीया यांच्या पुढाकाराने गेल्या 11 जुलै रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी यांना बी.सी.ए. व बी.एस्सी कॉम्प्युटर या शाखेत 20 टक्के प्रवेश संख्या वाढविण्यासाठी निवेदन देण्यात आले होेते. सदर युवासेनेची मागणी मान्य करत कुलगुरु यांनी दि. 20 जुलै 2023 रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार 20 टक्के प्रवेश संख्येत वाढ करण्यात आलेली आहे. पण जाहीर झालेल्या परिपत्रकात विद्यापीठ मान्यता प्राप्त विद्यार्थी संख्येपेक्षा अतिरीक्त विद्यार्थी संख्या 20 टक्के घेण्याची परवानगी दिलेली असुन ते सर्व प्रवेश प्रति विद्यार्थी अतिरीक्त संलग्नता शुल्क म्हणुन टयुशन शुल्काच्या 50 टक्के एवढी रक्कम विद्यापीठास अदा करण्याच्या अटीवर दिलेली आहे. ट्युशन फी सुमारे रुपये 6000 इतकी आहे.
सदर बाबतीतील खुलासा असा की प्रत्येक महाविद्यालयाला अतिरिक्त 20 टक्के विद्यार्थी संख्या घेतांना विद्यापीठाने दर्शविलेल्या अटीनुसार महाविद्यालय यांनी आवश्यक त्या सोयी सुविधा, तत्सम बीबीची उदा. वर्गखोल्या, प्रात्यक्षीकासाठी आवश्यक उपकरणे, गं्रथालयातील पुस्तकांची संख्या इ. गोष्टी पुर्तता करणे बंधनकारक आहे असे नमुद केलेले आहे, त्यानुसार जळगाव जिल्हातील प्रत्येक महाविद्यालय हे कर्मचारी सुध्दा सदर बाबीसाठी नियुक्त करतील त्यामुळे महाविद्यालयाला अतिरिक्त खर्चही करावा लागेल व तसेच विद्यार्थ्याना सुध्दा सदर शुल्क अदा करावे लागतील त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान व महाविद्यालयाला ही आर्थीक ताण पडणार असल्यानेे विद्यापीठाने मागील वर्षी या संदर्भात पत्र पारीत केलेल्या परीपत्रकाची पुनरावृत्ती करावी या विषयाचे निवेदन युवासेनेतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी यांना देण्यात आले. यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी हरीष माळी, युवतीसेना जिल्हा युवती अधिकारी सोनी सोनार, युवासेना विस्तारक कुणाल कानकाटे, युवासेना जळगाव लोकसभा कॉलेज कक्ष प्रमुख प्रितम शिंदे, हर्षल मुंडे, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, संदिप सुर्यवंशी, अमित जगताप, सचिन सोनवणे, जिल्हा प्रसिद्धी अधिकारी सिद्धेश नाशिककर, ओम पाटील, तुषार नहाळदे, कार्तीक माळी, लोकेश पारधे, देवेंद्र पाटील, आर्यन पाटील, वैभव मिस्तरी, सोनू कानकाटे आदि युवासैनिक उपस्थित होते.
विद्यार्थीहीत लक्षात घेता सदर निवेदनाची दखल घेऊन मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी विनंती युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांनी कुलगुरु माहेश्वरी यांना केली. कुलगुरु यांनी सुधारीत परिपत्रक जाहीर करण्याचे आश्वासन उपस्थित युवासैनिकांना दिले.