
इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची गांधी रिसर्च फाउंडेशन ला भेट
जळगाव : इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे प्रभारी प्राचार्य डॉ. इरफान इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या शैक्षणिक सहलीमध्ये बी.एड.च्या विद्यार्थ्यांनी गांधीजीं चे विचार आणि कार्य याविषयी ऑडिओ व्हिडिओ क्लिप द्वारे माहिती प्राप्त केली. तसेच गांधी रिसर्च फाउंडेशन मधील नैसर्गिक सुंदरता आणि प्रायोगिक विधीचे निरीक्षण केले. यावेळी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. वसीम सर, प्रा.डॉ. ईश्वर सोनगरे सर ,प्रा. कविता भास्कर मॅडम आणि निलोफर मॅडम उपस्थित होते.