खान्देश टाईम्स न्यूज l ०१ ऑगस्ट २०२३ l आपल्या भारत देशाच्या महान संविधानाने देश व देशवासीयांच्या सुरक्षेसाठी देशाच्या सीमेवर सैनिकांना तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलिसांना दिलेली आहे . दोघेही विभाग आपापल्या परीने सांगली कामगिरी पार पाडून देशवासी यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र परिश्रम घेतात. कर्तव्य बजावताना वेळप्रसंगी वीरमरण सुद्धा पत्करतात.
परंतु असे असताना सुद्धा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान चेतन सिंह याने सोमवारी पहाटे कर्तव्यावर असताना जयपुर मुंबई या रेल्वे गाडीमध्ये विनाकारण बेछूट गोळीबार करून आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तसेच तीन निर्दोष, निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार केलेले आहे. तसेच त्यांना ठार केल्यानंतर दोन धर्मात तेढ निर्माण होईल, देशाने अंगीकारलेल्या धर्मनिरपेक्षतेला तडा जाईल अशा प्रकारचे वक्तव्य करून एका राजकीय पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांचे नाव घेऊन संपूर्ण देशाचे वातावरण कुलुशित करण्याचे काम केलेले आहे. पोलिसांचे काम रक्षणाचे असतात परंतु त्या उलट हा रक्षक भक्षक बनलेला आहे. म्हणून चेतन सिंहाच्या निषेध करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून, त्याची खोलात जाऊन चौकशी करून लवकरात लवकर फाशी शिक्षा देण्यात यावी जेणेकरून यापुढे कोणीही अशा प्रकारच्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या व देशाच्या संस्कृतीच्या अगदी विरुद्ध अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नये म्हणून आज जळगाव शहरातल्या मुस्लिम बांधवांनी महामहीम राष्ट्रपती साहेबा, भारत सरकार ,नवी दिल्ली यांना मा .जिल्हाधिकारी सो. जळगाव यांच्या द्वारे निवेदन पाठवलेले आहे. याप्रसंगी सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव चे अध्यक्ष अयाज अली नियाज अली, इक्बाल वजीर, अहमद ठेकेदार, नाझीम पेंटर, शेख जलालुद्दीन, शफी ठेकेदार, नुरोद्दीन शेख, शकूर बादशहा, रहमान अयुब, अफझल लुकमान, मोहम्मद इम्रान, इकबाल अजीज, सलीम पटेल, सय्यद उमर, अब्दुल मुस्तकीम, नूर मोहम्मद शेख हुसेन, अब्दुल रशीद, सय्यद अखलाक, वसीम अहमद, हाजी रफिक खान इत्यादी उपस्थित होते.