खान्देश टाइम्स न्यूज | ५ ऑगस्ट २०२३ | जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून नऊ अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी सायंकाळी उशिरा काढण्यात आले. त्यात भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकपदी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लाच प्रकरणात तत्कालीन निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह तिघांवर कारवाई झाल्यानंतर 18 जुलैपासून पद रीक्त असल्याने भुसावळ बाजारपेठसाठी कुणाची नियुक्ती होणार? याबाबत उत्सुकता लागून होती.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी यांच्या आदेशानंतर नियंत्रण कक्षात नियुक्तीच्या प्रतीक्षेतील पाच अधिकार्यांना आता पोलीस ठाणे मिळाले आले. भुसावळ शहर वाहतूक शाखेत प्रथमच सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी महिला अधिकारी म्हणून रुपाली चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
बदली झालेले अधिकारी व मिळालेले पोलीस ठाणे असे –
नियंत्रण कक्षाचे सचिन सानप यांची पहूर पोलीस निरीक्षकपदी
नियंत्रण कक्षाचे विशाल जैस्वाल यांची जिल्हापेठ पोलीस ठाणे निरीक्षकपदी
नियंत्रण कक्षाचे बबन जगताप यांची सायबर पोलीस ठाणे निरीक्षकपदी
नियंत्रण कक्षाचे सुनील पवार यांची पारोळा पोलीस निरीक्षकपदी
नियंत्रण कक्षाचे अनिल भवारी यांची जळगाव शहर पोलीस निरीक्षकपदी
जिल्हापेठचे निरीक्षक बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकपदी
जिविशा शाखेचे रंगनाथ धारबळे यांची शनीपेठ पोलीस ठाणे निरीक्षकपदी
भुसावळ तालुक्याचे विलास शेंडे यांची जिविशा शाखेत निरीक्षकपदी
भुसावळ वाचक तथा सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली.