Airtel चा सोबत या दूरसंचार कंपनीचे सुध्दा प्रीपेड प्लॅन महाग होणार.

शेअर करा.

नवी दिल्ली । रिलायन्स जिओच्या २०१६ मधील पदार्पणाने सुरू झालेला स्वस्त दूरसंचार सेवांचा काळ अखेर संपुष्टात आला आहे . भारती एअरटेल या देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनीने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या भाड्यात २५ टक्के वाढ केली आहे . लवकरच व्होडा , आयडिया आणि जिओ देखील भाडेवाढीची घोषणा करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे .

एअरटेलच्या नुसार नवीन भाड्याचे दर २६ नोव्हेंबरपासून अंमलात येतील . एअरटेलच्या २८ दिवसांच्या प्रीपेड प्लॅनचा दर सध्या ७ ९ रुपये असून तो आता ९९ रुपये होईल . तर १४ ९ रुपयांचा प्लॅन १७ ९ रुपयांचा होईल . एका चांगल्या आणि निरोगी बिझनेस मॉडेलसाठी दर वाढवणे आवश्यक असल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे . मात्र त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे . हा मुद्दा मान्य करतानाच गुणवत्ता आणि सेवेतील सातत्य राखण्यासाठी ही दरवाढ करणे आवश्यक ठरत असल्याचे भारती एअरटेलतर्फे सांगण्यात आले आहे .

समभागांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक भाड्यात वाढ केल्याची सोमवारी घोषणा झाल्यानंतर भारती एअरटेलच्या समभागांनी किमतींनी उसळी मारली . कंपनीचा समभाग ७४ ९ .१५ रुपयांवरून ७५६ रुपयांच्या ५२ अाठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला . बाजार बंद होताना त्यात . ९ ० टक्क्यांची वाढ झाली .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply