ATM कार्डचे क्लोनिंग करून पैसे काढणाऱ्या टोळीकडून 66 एटीएम कार्ड केले जप्त.

धुळे : एटीएम कार्डची न समजता अदलाबदल करून त्याचे क्लोनिंग करून तात्काळ बँक खात्यातून पैसे लुबाडणाऱ्या हरियाणाच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शुक्रवारी सकाळी विजय प्राप्त झाला . चाळीसगाव च्या रोड चौफुलीवर सापळा लावून ही कामगिरी करण्यात आली . या टोळीकडून कार सोबत जवळपास ६६ एटीएम कार्ड त्याच बरोबर रोख असा एकूण ९ लाख ६० हजारांचा माल जप्त करण्यात आला . चौघांना अटक केलेली असून , यामध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे . हरियाणामधील एचआर ८० डी ३ ९ ८२ क्रमांकाची कार ही मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येत असून , या कारमध्ये ATM कार्डची क्लोनिंग करून लोकांना फसवणारी टोळी असल्याची गोपनीय अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना प्राप्त झाली होती . यानुसार शुक्रवारी चाळीसगाव रोड चौफुलीवर सापळा लावून ही कारवाई पार पाडण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published.