खान्देशगुन्हेजळगांव

मुक्ताईनगर येथे १ कोटींचा गुटखा जप्त; दोघांना अटक

मुक्ताईनगर येथे १ कोटींचा गुटखा जप्त; दोघांना अटक

एलसीबीच्या पथकाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी I महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. मुक्ताईनगर येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ कोटी, २ लाख, ३३ हजार ४६० रुपयांचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना ३ सप्टेंबर २०२५ रोजी मुक्ताईनगरमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी तात्काळ उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.

पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि पंचांसह मुक्ताईनगरच्या सारोळा फाट्यावर नाकाबंदी करून सापळा रचला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित गुटख्याने भरलेले वाहन पकडण्यात आले. पोलिसांनी वाहनासह १,०२,३३,४६० रुपयांचा गुटखा जप्त केला.

या प्रकरणी आरोपी आशिष राजकुमार जयस्वाल (रा. देवास, मध्यप्रदेश) आणि आशिफ खान बुल्ला खान (रा. नागपूर) यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह सलीम तडवी, छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम आणि भरत पाटील यांचा समावेश होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button