
जळगाव l जकी अहमद l २० जुलै २०२५ l “वेळ कमी होता, पण परिणाम खोल होता” ही ओळ पोलीस निरीक्षक अनिल विठ्ठल भवारी यांच्या कार्यशैलीसाठी अक्षरशः योग्य ठरते. जळगाव शहर पोलीस ठाण्यात दीड ते दोन वर्षे अतिशय नेटकेपणाने काम करून नावलौकिक मिळवलेले भवारी फक्त एक महिन्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि आता त्यांची बदली नाशिक ग्रामीण येथे झाली आहे.
जळगाव शहरात “दृश्य विकासाचा” ठसा!
भवारी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नाही, तर पोलीस ठाण्याचे संपूर्ण स्वरूप बदलवले.
त्यांनी –
🔹 पोलीस ठाण्यात सुशोभीकरणासाठी झाडांची लागवड केली
🔹 पोलीस ठाण्याच्या समोर सुदृढ भिंतीचे बांधकाम केले
🔹 मागच्या बाजूस नवीन इमारतीचे काम सुरू करून दिले
🔹 नवीन मंदिर बांधले – जे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा देत आहे
🔹 संपूर्ण ठाण्यावर रंगरंगोटी करून आकर्षक रूप दिले
या सर्व बाबी त्यांनी कोणत्याही गाजावाजाशिवाय, स्वत:च्या नेतृत्वगुणांतून साकारल्या.
चोपडा ग्रामीणमध्ये फक्त महिना, पण ठसा कायम!
जळगावहून बदली होऊन ते चोपडा ग्रामीण येथे आले आणि केवळ एका महिन्याच्या आतच त्यांची नाशिकला बदली झाली. मात्र एवढ्याच काळात त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनात शिस्त, त्वरित निर्णयक्षमता आणि मनमिळावूपणा यामुळे लोकांच्या मनात जागा मिळवली.
“साहेब शांत होते, पण कामात तडफदार होते!” – ही प्रतिक्रिया चोपड्यातील अनेक ग्रामस्थांची आहे. कर्मचाऱ्यांशी समता राखून वागणे, कुणावर अन्याय न होऊ देणे आणि कोणत्याही राजकीय-सामाजिक दबावास झुकवून न घेणे, ही त्यांची खास कार्यशैली होती.
सीमा सुरक्षा – गांजा व शस्त्र तस्करीला थेट इशारा
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील उमर्टी, गलांगी, सत्रासेन आणि वैजापूर या संवेदनशील गावांमध्ये गांजा व गावठी कट्ट्यांची तस्करी रोखण्यासाठी भवारी सरांनी साहसिक आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले.
त्यांच्या पुढाकाराने गावांत लावण्यात आलेल्या फलकांवर स्पष्ट संदेश देण्यात आला –
👉 “गांजा, गावठी पिस्टल, कट्टा विकणारेच आमचे खबरी आहेत. खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे!” हा थेट आणि धाडसी संदेश तस्करांवर मनोवैज्ञानिक दबाव निर्माण करणारा ठरला आहे. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.
पोलिसांनी संशयितांची माहिती देण्यासाठी विशेष क्रमांक जाहीर केला असून, गावकरी आणि पोलीस यांचं एकत्रित सहकार्य घडवून आणण्यासाठी भवारी सरांनी पहिलाच पायंडा पाडला.
माणूस म्हणून ‘भवारी सर’ हृदयात राहणार!
त्यांची बदली नाशिकला झाली असली, तरी “माणूस म्हणून भवारी” लोकांच्या हृदयात कायम राहतील, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी जिथे जिथे काम केले, तिथे अनुशासन, सौजन्य, नेतृत्व आणि सौंदर्यदृष्टी यांचा संगम घडवला. आणि म्हणूनच पोलीस खात्यातील सहकाऱ्यांपासून ते सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत, सगळ्यांच्या मनात आज एकच भावना आहे





