cryptocurrency चा व्यवहारांवर भारत घालणार बंदी अशा प्रकारे.

Khandeshtimes News नवी दिल्ली: संसदेत सादर न झालेल्या cryptocurrency नियमन विधेयकात क्रिप्टो चलनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव नाही . मात्र , क्रिप्टो ‘ एक्स्चेंज – टू – एक्स्चेंज ‘ हस्तांतरणावर बंदी घालण्यात येणार असल्याचे वृत्त आहे . चलनाच्या याबाबत सरकारने अधिकृतरीत्या कोणतेही वक्तव्य केलेले नाही . तथापि , काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीची वृत्ते दिली आहेत . विनिमय केंद्रांत ( बॉर्सेस ) होणाऱ्या cryptocurrency व्यवहारांवर पूर्णत : बंदीघालण्यात येणार आहे . याशिवाय cryptocurrency  धारकांची ओळख लपविणाऱ्या वॉलेट्सवर निर्बंध घातले जातील . ४ हजार क्रिप्टो चलनांशी

संपर्क उपलब्ध करून देणारे गुगल क्रोम एक्स्टेशन्स ब्लॉक केले जातील . सूत्रांनी सांगितले की , किरकोळ cryptocurrency व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी डिमॅट खात्याच्या धर्तीवर एक एकात्मिक वॉलेट तयार करण्याचा विचारही भारत सरकार करीत आहे . क्रिप्टो विनिमय केंद्रांना आपल्या व्यवहारांचे तिमाही विवरणपत्र सरकारला सादर करावे लागेल . क्रिप्टो विनिमय केंद्रावरील रुपयाच्या सर्व आवक – जावक व्यवहारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सरकार उभी करणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.