DB पथकाने धडक कार्यवाही करून एका पिस्तूल सोबत संशयिताला घेतले ताब्यात.

शिरपूर मुंबई – आग्रा महामार्गावरच्या शिरपूर फाट्याजवळ पोलिसांच्या डीबी पथकाने धडक कार्यवाही करून एका पिस्तूल सोबत दुचाकी असा संपूर्ण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे कळाले आहे . याप्रकरणासंबंधी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू केली आहे . शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना १० नोव्हेंबरला रात्रीच्या साडेअकराच्या सुमारास याबद्दलची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती .

 

मुंबई – आग्रा महामार्गावरच्या शिरपूर फाट्याजवळ अमोदा रस्त्यावरती नीलकंठेश्वर महादेव मंदिरासमोर सापळ रचून एका काळ्या रंगामधील एमएच १ ९ एजी २१२३ क्रमांक असणारी दुचाकी अडविण्यात आलेली आहे . संशयित असलेला हर्षल भिका माळी ( २१ , रा . रामसिंग नगर ) याची अंगझडती घेण्यात आलेली आहे . ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने या सर्वाच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख , सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड , ललित पाटील , गोविंद कोळी , विनोद आखडमल , अमित रनमळे , मुकेश पावरा , अनिल अहिरे ,प्रवीण गोसावी, मनोज दाभाडे , उमेश पवार आदींनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.