Drone industry मध्ये २० हजार नोकऱ्यांची सुवर्ण संधी.

नवी दिल्ली : भारतात ड्रोनबाबत धोरण जाहीर करण्यात आले आहे . त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड अशी संधी निर्माण होणार आहेत . भारतातील ड्रोन इंडस्ट्री पुढच्या ५ वर्षांमध्ये सुमारे ५० हजार कोटी रुपयांपर्यंत होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे . तसेच या क्षेत्रातून २० हजार लोकांना रोजगार प्राप्त होण्याची अपेक्षा आहे .

 

भारतात ड्रोनचा वापर बेकायदा सुरू होता . त्याच्या वापरावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध किंवा नियमन नव्हते . त्यामुळे केंद्र सरकारने ड्रोन धोरण लागू केले त्यामुळे हे क्षेत्र कायदेशीर पद्धतीने वाढणार आहे . नव्या धोरणामुळे ड्रोनचे उत्पादन व वापर अतिशय सोपे झाले आहे . नवे स्टार्टअपदेखील या क्षेत्रात सुरू होणार आहेत . परिणामी रोजगारनिर्मितीदेखील वाढण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे . ड्रोन इंडस्ट्री सध्या ५ हजार कोटी रुपयांची आहे . पुढील पाच वर्षांमध्ये हा उद्योग १५ ते २० हजार कोटींचा होईल , असा अंदाज आहे .

 

सरकारने ड्रोनच्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी PLI योजनेला मंजुरी दिली आहे . पुढील ३ वर्षामध्ये त्यात ५ ते १० हजार कोटी रुपयांची investment होण्याची अपेक्षा आहे . या योजनेमुळे जगभरातून भारतात उत्पादन , सुट्या भागांची निर्मिती तसेच software विकास आणि निर्यातीला प्रोत्साहन प्राप्त होईल .

Leave a Reply

Your email address will not be published.