Gun च्या धाक दाखवत एका व्यापारी लुटले, ते पण 7 लाखात.

Khandesh times News : जामनेर तालुक्यातील सोनाळा येथून मोटारसायकलवर पहुरला जात असलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला अज्ञात चार गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील 7 लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली . जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात आज ते नेहमीप्रमाणे सकाळी सोनाळा येथून पहुरकडे मोटरसायकलने येत असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान फॉरेस्ट तलावाजवळ अज्ञात चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये हिसकावुन घेतल्याची घटना आज सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली .

सोनाळा येथून हे अज्ञात संशयित त्यांचा पाठलाग करीत होते दोन जण तलावाजवळ आधीच थांबलेले होते दोन जणांनी संजय पाटील यांना धमकावत सात लाख रुपये हिसकावून घेतले पहूर पोलिस ठाण्यात संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पाचोरा जामनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक भारत काकडे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . व तपासकामी काही पथके रवाना करण्यात आली आहे . पुढील तपास पीएसआय बनसोडे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.