Income Tax रिटर्न ची तारीख झाली १५ मार्च, करदात्यांना दिलासा

शेअर करा.

नवी दिल्ली : कोरोनामुळे उद्धव आलेल्या परिस्थिती व ई – फायलिंग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी या सर्व कारणांमुळे विहित मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरू न शकणाऱ्या करदात्यांकरिता सरकारने दिलासा दिला आहे . रिटर्न भरण्याची मुदत ही आता १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आलेली आहे . याबाबतची घोषणा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ( सीबीडीटी ) मंगळवारी केली

 

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत तिसऱ्या वेळेस वाढविली असून . हे विशेष . या दरम्यान , उद्योगांनाही त्यांचे ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे . २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ही ३१ डिसेंबरपर्यंत होती . त्यानंतर रिटर्न दाखल केल्यास एक ते पाच हजार रुपयापर्यंतचे विलंब शुल्क लावले जाणार होते .

परंतु देशभरातील करदाते , सनदी लेखापाल आणि व्यावसायिकांनी असंख्य कोरोनाचा आपत्काळ आणि इन्कम टॅक्स पोर्टलवर ई – फायलिंग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी या सर्वांना मध्यस्ती ठेवता इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलेली होती .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply