• Tue. Aug 16th, 2022

  India vs south africa सामना रद्द होणार नाही

  ByKhandeshTimes

  Dec 23, 2021 ,

  नवी दिल्ली : खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ यापैकी कोणी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन केले जाईल . परंतु , भारत द.आफ्रिका यांच्यातील आगामी कसोटी व एकदिवसीय सामन्यांची मालिका हि स्थगित होणार नाही , अशी सामंजस्य स्वरूपात भूमिका बीसीसीआय आणि क्रिकेट द . आफ्रिका यांनी घेतल्याची माहिती सीएसएचे वैद्यकीय अधिकारी सुहेब मंजरा यांनी जाहीर केलेली आहे .

  कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन होण्यास बाध्य केले जाणार नाही , असेही ते म्हणाले . तीन कसोटी सामन्यांची मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होईल . द . आफ्रिकेत स्थिती अतिगंभीर असेल तर भारत माघार घेऊ शकतो , यावरही एकमत झाले . मंजरा म्हणाले , ‘ आम्ही बीसीसीआयशी चर्चा केली . प्रोटोकॉल आणि बायो – बबलविषयी मत जाणून घेतले . खेळाडू किंवा स्टाफ पॉझिटिव्ह आल्यास त्यांना त्याच हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येईल .

  संपर्कात आलेले खेळाडू सामना खेळणे आणि सराव सुरूच ठेवतील . त्यांची दररोज रॅपिड अँटिजन चाचणी केली जाईल . येथील बायो – बबलवर बीसीसीआय समाधानी आहे ‘

  Leave a Reply

  Your email address will not be published.