IPL मध्ये झाली कोरोनाची पुन्हा एन्ट्री.

दुबई : कोरोना च्या कारणाने मे महिन्यात स्थगित झालेली IPL स्पर्धा परत एकदा अडचण आली असून सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी . नटराजन बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खडबडी उडाली . परंतु,IPL च्या टाईम टेबल वर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची खात्री बीसीसीआयने दिली आहे . गुडघ्यावर झालेल्या ऑपरेशन नंतर नटराजनने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री केले होते . कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नटराजनच्या संपर्कात आलेल्या सर्व सदस्यांना विलगीकरणात पाठविले गेले आहे . यात भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून झालेले विजय शंकरही समाविष्ट आहे .

 

संसर्गाचे मुख्य कारण काय?

• BCCI ने कठोर बायो – बबल निर्माण केले असून दर तीन दिवसांनी सर्व खेळाडू , स्टाफ व अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट केला जात आहे . कोणालाच बायो – बबलच्या बाहेर जाण्यास निर्बंध लावले आहे . इतके असून देखील नटराजनला कोरोनाची लागण झालीच कशी , हाच मोठा प्रश्न पडला आहे .

• आरटी – पीसीआर टेस्ट मध्ये टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळला . त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे . उर्वरित सदस्यांचे टेस्ट अहवाल निगेटिव आले आहेत , असे बीसीसीआयने कळविले केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.