Jio च्या या नवीन प्लॅनमुळे मिळणार ग्राहकांना दिलासा, कमी किमतीत मिळणार जास्तीत जास्त ऑफर्स.

शेअर करा.

नवी दिल्ली : जिओ रिलायन्सने कमी किमतीचा प्लान समोर आणला आहे , जो यूजर्सना एक आनंदित बातमी देऊ शकतो . ही योजना SMS फायद्यांसह येते . Jio ने काही दिवसांआधी ट्रायकडे तक्रार केली होती की Vi कमी किमतीच्या Plan एसएमएस सुविधा देत नाही . आता Jio ने Vi च्या अडचणी वाढवण्याकरीत हा प्लान सादर केला आहे , जो फक्त 119 रुपयात येतो . एसएमएस व्यतिरिक्त या प्लॅनचे अनेक फायदे आहेत .

 

जिओचा 119 रुपयांचा Plan

रिलायन्स जिओच्या 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 14 दिवसांची वैधता मिळते . या प्लानमध्ये युजरला दररोज 1.5GB डेटा प्राप्त होत असतो , म्हणजेच प्लानमध्ये एकूण 21GB डेटा ग्राहकांना दिला जात असतो . प्लॅनसह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग व त्याचबरोबर 300 एसएमएस उपलब्ध आहेत . त्यासोबत , JioTV , JioCinema , Jiosecurity आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सचे Freeसबस्क्रिप्शन देखील प्राप्त होत असते . हा प्लॅन Airtel आणि Vi च्या SMS प्लॅनपेक्षा अत्यंत स्वस्त आहे .

 

प्लॅन एअरटेलचा सर्वात स्वस्त SMS प्लॅन 155 रुपयांचा आहे . या प्लॅनमध्ये वापरकर्त्याना 24 दिवसांची वैधता दिली जाते असे. प्लॅनमध्ये डेली 1GB डेटा , अमर्यादित कॉलिंग व त्यासोबत 300 SMS मिळतात . अतिरिक्त फायद्यामध्ये , प्राइम व्हिडिओ विनामूल्य चाचणी , विनामूल्य HelloTunes आणि विंक म्युझिक सदस्यत्व यामध्ये मिळत असे .

 

Vodafone – Idea ची सर्वात स्वस्त SMS योजना Vodafone – Idea चा सर्वात स्वस्त SMS प्लान Rs 179 मध्ये येतो . यामध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांची वैधता मिळते . यामध्ये यूजरला दररोज 2GB डेटा , कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग व 300 SMS मिळतात . त्यासोबत , Vi Movies आणि TV चे सदस्यत्व उपलब्ध आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply