# Khandesh Times ## Posts - [गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन](https://khandeshtimes.in/11621/): गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ​जळगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जळगावात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर उत्साही झाला होता. ​याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील योगदानावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पत्रकारिता” या विषयावर सविस्तर माहिती दिली. “बाबासाहेबांनी मूकनायक, … - [संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे](https://khandeshtimes.in/11618/): संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे समता सप्ताहात अभिवादन व स्वाभिमान मेळावा उत्साहात संपन्न जळगाव,: “समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन, … - [राहत्या घरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; एमआयडीसी परिसरातील घटना](https://khandeshtimes.in/11616/): राहत्या घरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; एमआयडीसी परिसरातील घटना जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरात राहत्या घरात गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १३ एप्रिल) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. कृष्णा वसंत रेणुके (वय ३६, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत युवकाचे नाव आहे. कृष्णा रेणुके हे एमआयडीसी परिसरातील चटई कंपनीत कामाला होते. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी त्यांच्या आई घरात गेल्या असता मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील … - [आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून; पती अटकेत](https://khandeshtimes.in/11614/): आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून; पती अटकेत शरीर सुखाच्या मागणीस नकार दिल्याने संताप; रावेर तालुक्यातील निमड्या येथील धक्कादायक घटना रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील निमड्या येथे आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा तिच्याच पतीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. लालूबाई शरद पावरा (वय २५) या महिलेचा ४ मार्च रोजी घराबाहेर गेल्यानंतर ५ मार्च रोजी सातपुडा पर्वतरांगातील दुर्गम दरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर ६ मार्च रोजी जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचा संशय असला तरी पोलिसांनी सखोल … - [डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात](https://khandeshtimes.in/11611/): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात देवाभाऊ फाऊंडेशन व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचा उपक्रम जळगाव  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवाभाऊ फाऊंडेशन व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन, जळगाव जिल्हा यांच्या वतीने माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सिव्हिल हॉस्पिटलसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि बहुजन-वंचितांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्याय यांचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल वाघ यांच्या हस्ते पुतळ्यास … - [महापालिकेच्या स्थायी समितीत मोबाईल टॉवर थकबाकीचा मुद्दा गाजला](https://khandeshtimes.in/11607/): महापालिकेच्या स्थायी समितीत मोबाईल टॉवर थकबाकीचा मुद्दा गाजला २८ कोटींची थकबाकी वसुलीसाठी कठोर कारवाईची मागणी जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज पार पडली असून, शहरातील मोबाईल टॉवर कंपन्यांकडील तब्बल २८ कोटी रुपयांच्या थकबाकीचा मुद्दा सभेत चांगलाच गाजला. स्थायी समिती सदस्य नितीन लढ्ढा यांनी प्रशासनाला धारेवर धरत, थकीत रकमेच्या वसुलीसाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली. मोबाईल टॉवर कंपन्यांकडून सन २०२६-२७ पूर्वीची आकारणी अद्याप थकीत असून, या कंपन्या महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतानाही महसुलापासून पालिकेला वंचित ठेवत आहेत. यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे लढ्ढा यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर शासनाशी पत्रव्यवहार करून कठोर कारवाई करावी, … - [सेंट टेरेसा विद्यालयाचा किक बॉक्सिंग स्पर्धेत दबदबा](https://khandeshtimes.in/11599/): सेंट टेरेसा विद्यालयाचा किक बॉक्सिंग स्पर्धेत दबदबा जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण-रजत पदकांची लयलूट; जळगाव संघाला उपविजेतेपद भुसावळ : प्रतिनिधी — दि. १२ एप्रिल रोजी भुसावळ येथे आयोजित जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत जळगाव शहरातील सेंट टेरेसा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध गटांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली. सुवर्णपदक विजेत्यांची चमकदार कामगिरी या स्पर्धेत जकरिया सय्यद, युग चौधरी, हितार्थ लाल, याहिया रंगरेज आणि आतिफ शेख यांनी दमदार खेळ करत सुवर्णपदकांवर नाव कोरले. त्यांच्या या यशामुळे जळगाव शहराचे नाव जिल्हास्तरावर उजळले. रजतपदकांसह संघाला उपविजेतेपद तसेच रुद्रक्ष काळे आणि शौर्य निकम यांनी रजतपदक पटकावत संघाच्या यशात मोलाचा वाटा … - [एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस जाळ्यात ](https://khandeshtimes.in/11594/): एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस जाळ्यात  जळगाव एसीबीची कारवाई जळगाव : प्रतिनिधी — शनिपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने तब्बल २ लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर १३ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचासमक्ष १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानुसार तक्रारदार शनिपेठ पोलीस ठाण्याबाहेर पोहोचला असता आरोपी विनोद अहिरे यांनी १ लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी … - [डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हे रस्ते राहतील बंद](https://khandeshtimes.in/11591/): डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हे रस्ते राहतील बंद जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी कडेकोट बंदोबस्त २१०० होमगार्ड, एसआरपीएफचे पथक तैनात; ४६० हून अधिक मिरवणुकांची तयारी जळगाव : प्रतिनिधी — भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी जिल्हाभरात उत्साहात आणि शांततेत कार्यक्रम पार पडावेत यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाने विशेष सुरक्षा आराखडा तयार केला आहे. या बंदोबस्तासाठी जिल्ह्यात २१०० होमगार्ड, एसआरपीएफचे २ प्लाटून, १४ स्ट्रायकिंग फोर्स आणि ८ आरसीपी पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १७२ ठिकाणी पुतळा पूजन, ४९६ … - [कासोदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवडे बाजार बंद](https://khandeshtimes.in/11588/): कासोदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवडे बाजार बंद जळगाव, – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कासोदा (ता. एरंडोल) येथे मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १४ एप्रिल रोजी चा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर भिमगीतांचा कार्यक्रम तसेच अन्य सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो त्याच परिसरात हे कार्यक्रम होणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दिवशी आठवडे बाजाराच्या निमित्ताने आसपासच्या गावांमधून मोठ्या संख्येने लोक … - [भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी; कुख्यात चेन स्नॅचर ‘आतंक’ जेरबंद](https://khandeshtimes.in/11585/): भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी; कुख्यात चेन स्नॅचर ‘आतंक’ जेरबंद भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यातील विविध जिल्ह्यांत चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांत धुमाकूळ घालणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीच्या हालचालींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात तो मागील काही दिवसांपासून फरार होता. अनेक जिल्ह्यांत ‘मोस्ट वॉन्टेड’ तपासादरम्यान उघड झाले की, सादिक अली याने जळगावसह राज्यातील विविध … - [जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार](https://khandeshtimes.in/11582/): जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार महापौरांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न जळगाव: जळगाव शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे महामार्गावरील अतिक्रमणवर आता महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी दुपारी जळगाव शहर महानगरपालिकेत महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, उपायुक्त पंकज गोसावी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, नगरसेवक अरविंद देशमुख, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, ‘नही’चे (NHAI) राहुल पाटील आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. *अजिंठा चौकातील भंगार बाजारावर होणार कारवाई* शहरातील … - [ई-केवायसीच्या नावाखाली विकृत कृत्य; ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांचा छळ](https://khandeshtimes.in/11579/): ई-केवायसीच्या नावाखाली विकृत कृत्य; ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांचा छळ शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; राज्यभर संतापाची लाट जळगाव (१२ एप्रिल २०२६) : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून, शासकीय योजनांच्या नावाखाली महिलांचा गैरफायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. ई-केवायसीच्या बहाण्याने घरात प्रवेश योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याच्या नावाखाली आरोपी गोकुळ रमेश चव्हाण याने संबंधित महिलेच्या घरी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने महिलेपुढे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. महिलेची तात्काळ तक्रार या प्रकाराने हादरलेल्या महिलेने … - [सै.नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन; विविध उपक्रमांची सुरुवात](https://khandeshtimes.in/11576/): सै.नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन; विविध उपक्रमांची सुरुवात जळगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांची सुरुवात रविवारी (दि. १२ एप्रिल) उत्साहात करण्यात आली. हे कार्यक्रम १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी १० वाजता रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच संविधान, देश आणि देशवासीयांप्रती निष्ठा राखण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी सै. अयाज अली नियाज अली यांनी मनोगत … - [घरफोडी करणारे तीन अट्टल चोर जेरबंद ;जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी](https://khandeshtimes.in/11573/): घरफोडी करणारे तीन अट्टल चोर जेरबंद ;जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ​राजमालतीनगरमधील चोरीचा छडा; ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ​जळगाव | प्रतिनिधी शहरातील राजमालतीनगर भागात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला (DB) यश आले आहे. याप्रकरणी तीन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​नेमकी घटना काय? दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसरातील रहिवासी संजू बिस्मिल्ला पटेल यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ३२ हजार रुपये किमतीची ‘चिलर मशीन’ आणि ३० हजार रुपये किमतीचा ‘५ एच.पी.चा पाण्याचा मोटार पंप’ असा मुद्देमाल लांबवला होता. याप्रकरणी जळगाव … - [जळगावचे नवे  अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी पदभार स्वीकारला](https://khandeshtimes.in/11568/): जळगावचे नवे  अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी पदभार स्वीकारला कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर जळगाव (प्रतिनिधी) जळगावचे नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या बदली व पदोन्नती आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी गावित यांची नियुक्ती करण्यात आली. नखाते यांच्या बदलीबाबत स्वतंत्र आदेश येणे बाकी आहे. पदभार स्विकारताना नखाते यांनी गावित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पदभार स्विकारल्यानंतर गावित यांनी गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा तसेच नागरिकांशी … - [UPI व्यवहारांवर RBI ची कडक नजर; ₹१० हजारांवरील ट्रान्सफरला ‘कूलिंग-ऑफ’, ‘किल स्विच’सारख्या नव्या सुविधा लागू होणार](https://khandeshtimes.in/11565/): UPI व्यवहारांवर RBI ची कडक नजर; ₹१० हजारांवरील ट्रान्सफरला ‘कूलिंग-ऑफ’, ‘किल स्विच’सारख्या नव्या सुविधा लागू होणार जळगाव (प्रतिनिधी)डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना सायबर फसवणुकीच्या घटनांनाही आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. Google Pay, PhonePe तसेच इतर UPI अ‍ॅप्स वापरणाऱ्यांसाठी नव्या सुरक्षात्मक नियमांचा प्रस्ताव समोर आला आहे. या नव्या नियमांनुसार, ₹१० हजारांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केल्यास ती तात्काळ समोरच्या खात्यात जमा होणार नाही. अशा व्यवहारांसाठी सुमारे १ तासाचा ‘कूलिंग-ऑफ पीरियड’ ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या कालावधीत व्यवहार चुकीचा असल्यास किंवा फसवणुकीचा संशय आल्यास तो थांबवता येणार आहे. फसवणुकीवर नियंत्रणाची संधी या सुविधेमुळे चुकीच्या खात्यावर पैसे पाठवणे … - [महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन](https://khandeshtimes.in/11562/): महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन आ. राजुमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते माल्यार्पण जळगाव: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. येथील सेंट्रल फुले मार्केट परिसरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महात्मा फुले यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाला मनोज चौधरी (उपमहापौर), अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, दीपक सूर्यवंशी (महानगर जिल्हाध्यक्ष), अनिल अडकमोल (नगरसेवक), निलेश तायडे (नगरसेवक), विजय बांदल (नगरसेवक) यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने … - [बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा](https://khandeshtimes.in/11559/): बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा जळगाव – समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा व महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या औचित्याने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रोबेशनरी ऑफिसर वृषाली चौरे यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून अधिकारी पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडत महिलांना आत्मविश्वासाचा संदेश दिला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगावचे धीरज श्रीनिवास पाटील यांनी ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची सविस्तर … - [जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर; उष्णतेच्या लाटेचा इशारा, प्रशासन सतर्क](https://khandeshtimes.in/11556/): जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर; उष्णतेच्या लाटेचा इशारा, प्रशासन सतर्क जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता असून पुढील आठवडाभर उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ११ ते १६ एप्रिल दरम्यान आकाश स्वच्छ राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने उकाडा अधिक तीव्र जाणवणार आहे. ११ आणि १२ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर १३ ते १६ एप्रिलदरम्यान तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रकोप वाढणार असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. सतत वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः … - [ज्यूसच्या बहाण्याने मोटरसायकल लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद](https://khandeshtimes.in/11553/): ज्यूसच्या बहाण्याने मोटरसायकल लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद अमळनेर (प्रतिनिधी)ज्यूस प्यायचा बहाणा करून स्टेट बँकेसमोर उभी असलेली मोटरसायकल चोरून नेल्याची घटना ५ तारखेला रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हिम्मत संदानशीव यांनी आपली मोटरसायकल (क्र. एमएच १९ बीएल ६८७५) स्टेट बँकेसमोर असलेल्या ज्यूसच्या दुकानाजवळ उभी केली होती. त्यावेळी ज्यूस विक्रेत्याने “घरून चार्जिंग लाईट घेऊन येतो” असे सांगून मोटरसायकलची चावी घेतली. चावी लावून मोटरसायकल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच एक अनोळखी व्यक्ती तेथे आली आणि ज्यूस मागितला. ज्यूस … - [जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” - पालकमंत्री गुलाबराव पाटील](https://khandeshtimes.in/11549/): जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील उग्रवाद्यांच्या गोळीबारात जखमी होऊनही कर्तव्य निभावले; 74% अपंगत्वावर मात करत देशसेवा सुरूच जळगाव : कठीण आणि जीवघेण्या परिस्थितीतही कर्तव्य पार पाडणे हीच खरी देशभक्ती असून गोळीबारात गंभीर जखमी होऊनही जबाबदारी पूर्ण करणारे जावेद अहमद हे खरे वीर आहेत. त्यांच्या अदम्य साहसाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजना’ अंतर्गत ₹60 लाखांची आर्थिक मदत प्रदान केली असून ही मदत म्हणजे त्यांच्या शौर्याला दिलेला सन्मान आणि कृतज्ञतेची भावना आहे. “देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचे शौर्य, त्याग आणि समर्पण हे अमूल्य आहे. . … - [पीएफएमएस तांत्रिक बिघाडामुळे ‘मार्च एंड’ला ब्रेक; जिल्हा परिषदांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ](https://khandeshtimes.in/11547/): पीएफएमएस तांत्रिक बिघाडामुळे ‘मार्च एंड’ला ब्रेक; जिल्हा परिषदांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ लेखांकन व देयक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभागाचे निर्देश; राज्यातील झेडपींचे कामकाज वाढले जळगाव : जिल्हा परिषदांच्या फंड मॉनिटरिंग सिस्टीम (पीएफएमएस) मध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ‘मार्च एंड’ पूर्ण होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, राज्याच्या ग्रामविकास विभागाने लेखांकन व देयक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदांचा मार्च एंड थेट एप्रिल अखेरपर्यंत लांबला आहे. शेवटच्या दिवशी तांत्रिक अडथळा आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी, ३१ मार्च रोजी सर्वच शासकीय विभागांप्रमाणे जिल्हा परिषदांमध्येही निधी खर्च व बिले मंजुरीसाठी मोठी धावपळ झाली. … - [अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत](https://khandeshtimes.in/11544/): अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत ​प्रतिनिधी I जळगाव जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती झाली असून शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी त्यांच्या या नियुक्तीचे आदेश जरी केले आहेत . जळगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागेवर राज्य पोलिस सेवेतील अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने तीन अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. नखाते यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश निघणार असल्याने त्यांची नियुक्ती कुठे करण्यात आली हे लगेच समजू शकले नाही. जिल्ह्यात कामाचा अनुभव संदीप गावीत यांनी यापूर्वी जळगावचे पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे त्यांना जिल्ह्याची माहिती आहे भुसावळ विभागाची … - [एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; दुचाकी चोरटा १२ तासात जेरबंद](https://khandeshtimes.in/11540/): जळगाव l प्रतिनिधी l शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असतानाच, एम.आय.डी.सी. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून अवघ्या १२ तासांच्या आत एका दुचाकी चोरट्याला जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर हस्तगत केली असून परिसरात पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे. नेमकी घटना काय? तांबापुरा भागातील रहिवासी अरुण सखाराम अहीरे (वय ३८) यांनी ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपली दुचाकी (क्रमांक MH-28 G 3256) घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना आपली दुचाकी जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी तातडीने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव … - [धक्कादायक! जळगावमध्ये ३१ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार](https://khandeshtimes.in/11537/): धक्कादायक! जळगावमध्ये ३१ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार ​गुंगीचे पेय देऊन नराधमांचे पाशवी कृत्य; एमआयडीसी पोलिसांकडून मुख्य आरोपीला बेड्या ​जळगाव (प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका ३१ वर्षीय विवाहित महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका नराधमाला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रामेश्वर कॉलनी परिसरात वास्तव्यास आहे. १३ मार्चच्या रात्री ११:३० ते १४ मार्चच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेचे नातेवाईक असलेल्या राजेश … - [पत्नीच्या खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास](https://khandeshtimes.in/11534/): पत्नीच्या खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल  अमळनेर (प्रतिनिधी) : पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. भगवान रामदास शिंपी (वय ६०, रा. ताडेपुरा, पैलाड, ता. अमळनेर) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, भगवान शिंपी हे व्यवसायाने टेलरिंगचे काम करत होते आणि ते रवी टेलर यांच्या दुकानात कामाला होते. ते पत्नी सुरेखा शिंपी यांना नेहमी मारहाण करत असल्याने सुरेखा यांनी याबाबत रवी टेलर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी … - [सोन्या-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांना दिलासा](https://khandeshtimes.in/11532/): सोन्या-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांना दिलासा प्रति तोळा सोनं ९८० रुपयांनी स्वस्त जळगाव : जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली असतानाच देशांतर्गत सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सराफ बाजारातील माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९८० रुपयांनी घसरून १ लाख ६१ हजार २४० रुपयांवर आला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९०० रुपयांनी कमी होऊन १ लाख ४७ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७४० रुपयांनी घटून १ लाख २० हजार ९३० रुपये इतका … - [उष्णतेचा कडाका वाढला; जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा घटला](https://khandeshtimes.in/11529/): उष्णतेचा कडाका वाढला; जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा घटला गिरणा धरणातील जलसाठा ५० टक्क्यांखाली जळगाव : मागील काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा कडाका वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला असून वाढत्या उष्णतेमुळे प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने जलसाठ्यात घट होताना दिसत आहे. १२ मार्चच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सध्या ५९.६४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा आता ५० टक्क्यांखाली गेला आहे. त्यामुळे आगामी चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याचा वापर नागरिकांना सावधपणे करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी मान्सून काळात … - [ई-रिक्षा, ई-बाईकसाठी परमिट बंधनकारक; रिक्षा-टॅक्सी नवीन परमिट प्रक्रिया तात्पुरती स्थगित](https://khandeshtimes.in/11525/): ई-रिक्षा, ई-बाईकसाठी परमिट बंधनकारक; रिक्षा-टॅक्सी नवीन परमिट प्रक्रिया तात्पुरती स्थगित प्रवासी वाहतुकीत समान नियम लागू करण्याचा निर्णय मुंबई : राज्यात रिक्षा व टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी मोटार वाहन विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांची संख्या लक्षात घेता केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रवासी वाहतुकीसाठी एकसमान नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रिक … - [गॅस टंचाई टाळण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समित्या](https://khandeshtimes.in/11523/): गॅस टंचाई टाळण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समित्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची उपाययोजना मुंबई : इराण–इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलिंडरच्या संभाव्य तुटवड्याबाबत सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. राज्यभर गॅस पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी संबंधित यंत्रणांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित राहील, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार मार्च महिन्यात गेल्या … - [महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल: सर्व सरकारी योजना आता एकाच क्लिकवर](https://khandeshtimes.in/11520/): महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल: सर्व सरकारी योजना आता एकाच क्लिकवर ‘सिंगल विंडो’ डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अर्ज व लाभ मिळवणे झाले सोपे मुंबई (प्रतिनिधी) — महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी तयार केलेल्या ‘महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ द्वारे आता सर्व सरकारी योजना एका क्लिकवर मिळू शकतात. या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे दिव्यांग लाभार्थ्यांना अनेक सरकारी कार्यालयांना भेट न देता ऑनलाइन अर्ज व लाभ मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. संकल्पना आणि प्रमुख वैशिष्ट्ये हा पोर्टल ‘सिंगल विंडो’ तत्त्वावर कार्यरत असून एकदाच नोंदणी करून पात्रतेनुसार सर्व शासकीय योजना पाहता येतात आणि अर्ज करता येतो. अर्ज प्रक्रियेत कागदपत्रांची गरज नाही; पूर्णपणे कागदपत्रमुक्त (Paperless) सेवा आहे. यामुळे घरबसल्या अर्ज … - [जळगावात अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांना मनपाचा दणका; दोन क्लासेसना १ लाख २० हजारांचा दंड](https://khandeshtimes.in/11518/): जळगावात अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांना मनपाचा दणका; दोन क्लासेसना १ लाख २० हजारांचा दंड ​जळगाव: प्रतिनिधी जळगाव शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत बॅनर व स्टिकर्सवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. मू.जे. महाविद्यालय परिसरातील विनापरवाना फलकबाजी महापालिकेने गांभीर्याने घेतली असून, दोन खाजगी क्लासेसना प्रत्येकी ६० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख २० हजार रुपयांचा दंडाचा बडगा उगारला आहे. मनपाच्या या धडक कारवाईमुळे विनापरवाना जाहिरातबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ​अग्रवाल चौक ते मू.जे. महाविद्यालय या परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट झाला होता. यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर होत होतेच, … - [घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन](https://khandeshtimes.in/11515/): घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन जळगाव – सध्या पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता,स्थानिक स्तरावर घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे सेल्स अधिकारी तसेच निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे. नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रारी असल्यास 0257-2223180 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या … - [जळगाव जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर २१ जणांना नियुक्ती](https://khandeshtimes.in/11513/): जळगाव जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर २१ जणांना नियुक्ती गुढीपाडव्यापूर्वी मिळणार ‘नोकरीचे गिफ्ट’; २३ निलंबित कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना जळगाव : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या २१ उमेदवारांना शुक्रवारी (दि.१३) नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. त्याआधी आज या उमेदवारांचे समुपदेशन करण्यात येणार असून गुढीपाडव्यापूर्वीच त्यांना नोकरीचे ‘गिफ्ट’ मिळणार आहे. यासोबतच विविध कारणांमुळे निलंबित असलेल्या २६ कर्मचाऱ्यांपैकी २३ जणांना पुनर्स्थापित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अनुकंपा भरतीसाठी २१६ उमेदवार प्रतीक्षेत जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी सध्या २१६ उमेदवार प्रतीक्षेत आहेत. यापैकी १८ उमेदवारांनी गट ‘ड’ श्रेणीत नियुक्ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली असून त्यासाठीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे. तीन … - [विश्रामगृह ते पिपरुड रोडवर पथदिवे व गतिरोधकांची मागणी](https://khandeshtimes.in/11510/): विश्रामगृह ते पिपरुड रोडवर पथदिवे व गतिरोधकांची मागणी नगरसेविका सिमरन वानखेडे व महिला सदस्यांचे नगरपरिषदेला निवेदन सावदा | प्रतिनिधी : सावदा शहरातील विश्रामगृह ते पिपरुड रोड (रिंगरोड) या मार्गावर पथदिवे व गतिरोधकांची उभारणी करावी, अशी मागणी नगरसेविका कु. सिमरन राजेश वानखेडे तसेच इतर महिला सदस्यांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मार्गावर दररोज सकाळी व सायंकाळी वॉकिंगसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असून त्यात महिला व तरुणींची संख्या लक्षणीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर रस्ता नव्याने तयार झालेला व रुंद असल्यामुळे वाहतुकीसोबतच पायी फिरण्यासाठीही नागरिक मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करत आहेत. मात्र काही ठिकाणी पथदिव्यांचा अभाव असल्याने रात्रीच्या … - [वडिलांवरील मारहाणीचा बदला; मुलाकडून भरदिवसा दोन राऊंड गोळीबार](https://khandeshtimes.in/11505/): वडिलांवरील मारहाणीचा बदला; मुलाकडून भरदिवसा दोन राऊंड गोळीबार घरकुल चौक परिसरात खळबळ; मुख्य संशयित फरार, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले जळगाव | प्रतिनिधी : शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी दुपारी भरदिवसा गोळीबाराची थरारक घटना घडल्याने घरकुल चौक परिसरात एकच खळबळ उडाली. वडिलांना झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने मुलाने गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम चौकातील रहिवासी रसाल राठोड (वय ४८) हे मंगळवारी दुपारी नेरीनाका स्मशानभूमीकडून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. या मारहाणीत राठोड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी झाल्यानंतर … - [लाडकी बहीण’ योजनेत १.०५ कोटी महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता; रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल](https://khandeshtimes.in/11502/): ‘लाडकी बहीण’ योजनेत १.०५ कोटी महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता; रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल निवडणुकीवेळी सर्वांना लाभ, आता पडताळणीत महिलांना वगळले जात असल्याचा आरोप मुंबई | प्रतिनिधी : राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. मात्र योजनेच्या सध्या सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेत सुमारे १ कोटी ५ लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, विधिमंडळात … - [कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिलांचा गौरव](https://khandeshtimes.in/11499/): कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिलांचा गौरव महिला दिनानिमित्त महाराष्ट्र सुवर्णकार सेना व महिला मंडळाच्या वतीने सन्मान जळगाव | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा, अहिर सुवर्णकार महिला मंडळ तसेच ऋणानुबंध वधू-वर पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महिला पोलिसांच्या कर्तव्यपरायण सेवेला सलाम करत त्यांना सुगंधी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका रंजना वानखेडे तसेच पोलीस निरीक्षक पवन देसले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ट्रॅफिक विभागातील महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी महिला पोलिस अधिकारी … - [महिला दिनानिमित्त समाजसेविका व ज्येष्ठ पत्रकार सुनिता महाडिक यांचे मार्गदर्शन](https://khandeshtimes.in/11496/): महिला दिनानिमित्त समाजसेविका व ज्येष्ठ पत्रकार सुनिता महाडिक यांचे मार्गदर्शन तरवाडे जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात चाळीसगाव | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरवाडे येथे सोमवारी (दि. ९ मार्च) प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजसेविका व Live नवं विचार News च्या मुख्य संपादक सुनिता राजेंद्र महाडिक यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाडिक यांचे स्वागत कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांच्या हस्ते सुनिता महाडिक यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाडिक यांच्या सामाजिक, पत्रकारिता आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक केले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जावे या प्रसंगी … - [रमजाननिमित्त गरजू कुटुंबांना रेशन किटचे वाटप](https://khandeshtimes.in/11492/): रमजाननिमित्त गरजू कुटुंबांना रेशन किटचे वाटप गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम जळगाव | प्रतिनिधी : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने दावते इस्लामी इंडिया या संस्थेच्या सामाजिक शाखा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) तर्फे जळगाव शहरात गरजू कुटुंबांना रमजान रेशन किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. आवश्यक खाद्यपदार्थांचा समावेश वितरित करण्यात आलेल्या प्रत्येक रेशन किटमध्ये दैनंदिन वापरातील आवश्यक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला होता. यात तांदूळ, गहू पीठ, डाळ, साखर, चहा, खजूर, मसाले आदी वस्तूंचा समावेश होता. रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या कुटुंबांना या साहित्याचा उपयोग होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. दानदाते व स्वयंसेवकांचे आभार या प्रसंगी … - [खोट्या लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन](https://khandeshtimes.in/11488/): खोट्या लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलनच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक वाढली जळगाव | प्रतिनिधी : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चलनच्या नावाखाली खोट्या लिंकद्वारे नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. केवळ अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा वाहन नोंदणीसाठी VAHAN, ड्रायव्हिंग लायसन्स सेवांसाठी SARATHI, तसेच परिवहन सेवांसाठी Parivahan या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. तसेच ई-चलन भरण्यासाठीही अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करणे आवश्यक आहे. या सर्व संकेतस्थळांचा शेवट gov.in या अधिकृत डोमेनने होत असल्याने नागरिकांनी याची खात्री करूनच व्यवहार … - [](https://khandeshtimes.in/11485/): रसलपुरात गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; तीन आरोपी अटकेत १७५ किलो गोमांस व धारदार हत्यारे जप्त; रावेर पोलिसांची कारवाई रावेर (प्रतिनिधी) : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रसलपुर येथील कुरेशी मोहल्ल्यात अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर छापा टाकत तिघांना अटक केली. या कारवाईत सुमारे १७५ किलो गोमांस व धारदार हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. गुप्त माहितीवरून छापा गुप्त बातमीदारामार्फत रावेर तालुक्यातील रसलपुर गावातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. १० मार्च रोजी पहाटे रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. पिता–पुत्रांसह तिसरा आरोपी अटकेत छाप्यादरम्यान शेख … - [सावदा शिवारात ९३ गांजाच्या झाडांचा साठा जप्त](https://khandeshtimes.in/11481/): सावदा शिवारात ९३ गांजाच्या झाडांचा साठा जप्त पोलिसांची धडक कारवाई; एकास अटक सावदा (प्रतिनिधी) : सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बैरम बुवा देवस्थान परिसरातील शेतात अवैधरित्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी धडक कारवाई करत ९३ गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीवरून छापा गोपनीय माहितीच्या आधारे सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १०) दुपारी सुमारे चार वाजता सावदा-फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळील बैरम बुवा देवस्थान परिसरातील गट क्रमांक ४६३ मधील शेतावर छापा टाकण्यात आला. या शेतात निलेश रमेश पाटील (वय ४०, … - [मनपाचे १४५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर](https://khandeshtimes.in/11478/): मनपाचे १४५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर साडेआठ कोटींचे शिलकी बजेट; स्थायी समितीकडून अभ्यासानंतर महासभेत मंजुरी जळगाव : प्रतिनिधी — जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंगळवारी साडेआठ कोटी रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी १४५२ कोटी रुपयांचे मुळ अंदाजपत्रक सभेसमोर ठेवण्यात आले असून त्यावर स्थायी समितीकडून सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर हे अंदाजपत्रक महासभेसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. नवीन नगरसेवकांच्या निवडीनंतर स्थायी समितीची ही पहिलीच सभा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त प्रशासन निर्मला पेखळे-गायकवाड … - [शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा](https://khandeshtimes.in/11475/): शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’च्या बैठकीत वक्त्यांचे मत   जळगाव, (प्रतिनिधी): गांधी रिसर्च फाउंडेशन आणि एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’ ही राष्ट्रीय बैठक जैन हिल्स येथे 8 मार्चपासून सुरु आहे. या बैठकीच्या तिसऱ्या दिवशी देश-विदेशातून आलेल्या शांतीदुतांनी हवामान बदल आणि अहिंसक अर्थव्यवस्था यासारख्या विषयांवर चर्चा केली. शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग, स्थानिक समुदायांची भूमिका आणि जागतिक स्तरावरील सहकार्य आवश्यक असल्याचे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले.   “वर्किंग इन कॉन्फ्लिक्ट रिजन” या सत्रात काश्मीर, मणिपूर, नागालँड आणि नक्षलग्रस्त भागातील अनुभव मांडण्यात आले. “जमीन अधिकार, सामाजिक न्याय, … - [आरटीई प्रवेशातील ‘१ किमी’ची अट रद्द; एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश](https://khandeshtimes.in/11472/): आरटीई प्रवेशातील ‘१ किमी’ची अट रद्द; एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश न्यायालयाच्या स्थगितीनंतर सरकारचा निर्णय; पालकांमध्ये समाधानाचे वातावरण जळगाव : राज्यातील मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लागू केलेली ‘१ किलोमीटर अंतराची अट’ अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयासाठी विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर शहराची भौगोलिक परिस्थिती आणि विस्तार लक्षात घेतल्यास येथील अनेक नामांकित शाळा शहराच्या मुख्य वस्तीपासून काही अंतरावर आहेत. त्यामुळे … - [सौ रजनीताई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा](https://khandeshtimes.in/11469/): सौ रजनीताई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा भडगाव/प्रतिनिधी  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय शास्त्रज्ञ भारतरत्न सर सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ या शोधाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एम. मराठे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात सर सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ या शोधाचे महत्त्व तसेच विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच तृतीय वर्ष विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख … - [व्ही. पी. होले. शिक्षणशास्त्र  महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा](https://khandeshtimes.in/11466/): व्ही. पी. होले. शिक्षणशास्त्र  महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा जळगाव प्रतिनिधी के.सी.ई.सोसायटीचे व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.रंजना सोनवणे यांनी उपस्थित सर्व प्राध्यापीका व विद्यार्थीनी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.कार्यक्रमाचे समन्वयन डॉ.संभाजी जमधडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर महिला प्रतिनिधी म्हणून डॉ.सुनीता नेमाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना महिला सन्मान व महिलांच्या प्रापंचिक जबाबदार्या याविषयी मत मांडतांना महिलांचा आदर नेहमीच केला पाहिजे तसेच खरे पाहता आजही स्त्रियांना समान अधिकार प्राप्त झालेले नाहीत असे मत मांडले.तर अध्यक्षिय भाषणात डॉ. रंजना सोनवणे यांनी स्त्रियांच्या व्यथा आणि … - [विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी सजली अभ्यास जत्रा](https://khandeshtimes.in/11463/): विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी सजली अभ्यास जत्रा जळगाव  प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये “अभ्यास जत्रा” हा अनोखा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमांतर्गत विविध शैक्षणिक साहित्याची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितली यामध्ये “द थर्स्टी क्रो” , पुंगी वाल्याची गोष्ट, शेतीची माहिती, यात्रेची माहिती अशा विविध प्रकारचे शालेय शैक्षणिक साहित्य ठेवले गेले होते आणि जवळजवळ शंभर ते दीडशे पालकांसमोर विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक साहित्याची माहिती सांगितली. यामध्ये सीनियर बालवाडी सत्यम, शिवम, सुंदरम तीनही गटातील विद्यार्थी सहभागी होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून के. सी. ई. सोसायटीचे रेडिओ मनभावन संचालक अमोल देशमुख उपस्थित होते. पाहुण्यांसोबत पालकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आणि योग्य … - [गांधी विचार परीक्षेत झांबरे विद्यालयाचा केतन गिरीश पाटील जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण](https://khandeshtimes.in/11460/): गांधी विचार परीक्षेत झांबरे विद्यालयाचा केतन गिरीश पाटील जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण जळगाव- ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीचा केतन गिरीश पाटील हा विद्यार्थी गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.तर हर्ष शिंपी, श्रीनिधी साधूराव तागड, मानवी अरविंद पाटील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. विद्यालयातील एकूण साडेआठशे विद्यार्थी गांधी विचार परीक्षेला प्रविष्ट झाले होते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक, आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी अभिनंदन केले. - [आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ द्या; एकनाथराव खडसे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी](https://khandeshtimes.in/11458/): आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ द्या; एकनाथराव खडसे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी १ किमी अंतराच्या अटीला न्यायालयाची स्थगिती; सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी मुंबई : सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लागू केलेल्या १ किलोमीटर अंतराच्या अटीला Bombay High Court Nagpur Bench ने स्थगिती दिल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. खडसे यांनी पत्रात नमूद केले आहे की, १ किमी अंतराच्या मर्यादेमुळे राज्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण व निमशहरी भागातील … - [जळगाव जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नियमित कर्जदारांना व्याजातून मिळणार मुक्ती!](https://khandeshtimes.in/11455/): जळगाव जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नियमित कर्जदारांना व्याजातून मिळणार मुक्ती! ​३१ मार्चपर्यंत कर्जफेड करणाऱ्यांना ६४ कोटींच्या व्याजाची सवलत; १.६४ लाख शेतकरी ५० हजारांच्या अनुदानासाठी पात्र ​जळगाव | प्रतिनिधी आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एप्रिल २०२५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ८६५ नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडून बँक यावर्षी व्याज आकारणार नाही, अशी ऐतिहासिक घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी केली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ६४ कोटी ३२ लाख रुपयांचा थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. ​३१ मार्चची मुदत अन् ५० हजारांचे अनुदान … - [इस्राईल–इराण तणावामुळे गॅस तुटवड्याची चर्चा](https://khandeshtimes.in/11453/): इस्राईल–इराण तणावामुळे गॅस तुटवड्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात एलपीजीचा पुरेसा साठा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जळगाव (प्रतिनिधी) — इस्राईल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या चर्चांना उधाण आले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती वितरक कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत विविध संदेश प्रसारित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल) या गॅस वितरक कंपन्यांकडून जिल्ह्यातील गॅस साठा … - [‘दक्षता’ पेट्रोल पंपातील १.३३ कोटींचा अपहार; पीएसआय वाल्मीक वाघ शरण](https://khandeshtimes.in/11451/): ‘दक्षता’ पेट्रोल पंपातील १.३३ कोटींचा अपहार; पीएसआय वाल्मीक वाघ शरण पोलिसांची कारवाई; मुलगा शेखर वाघलाही अटक जळगाव (प्रतिनिधी) — जळगाव पोलीस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘दक्षता’ पेट्रोल पंपावरील तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांच्या बहुचर्चित अपहार प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेले व्यवस्थापक तथा पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ अखेर सोमवारी (दि. ९) पोलिसांसमोर शरण आले. पोलिसांनी वाघ यांना ताब्यात घेत त्यांच्या मुलगा शेखर वाघ यालाही अटक केली असून या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत ‘दक्षता’ पेट्रोल पंप चालविण्यात येतो. या पंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. … - [पत्रकार-विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा](https://khandeshtimes.in/11448/): पत्रकार-विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा महामंडळ लवकर कार्यान्वित करण्याची सरकारची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी — राज्यातील वृत्तपत्र क्षेत्र आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो पत्रकार, कर्मचारी व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणींचा मुद्दा सोमवारी विधान परिषदेत पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय सभागृहात मांडत सरकारचे लक्ष वेधले. पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणींवर तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना सरकारने सकारात्मक भूमिका घेत पत्रकार व विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले महामंडळ पुढील अधिवेशनापूर्वी कार्यान्वित करण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोमवार (दि. ९) रोजी झालेल्या चर्चेत आमदार भारतीय यांनी राज्यातील नोंदणीकृत वृत्तपत्रे, त्यामध्ये … - [जळगाव बाजार समितीत भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; चार संचालकांच्या प्रवेशाने निर्विवाद वर्चस्व!](https://khandeshtimes.in/11443/): जळगाव बाजार समितीत भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’; चार संचालकांच्या प्रवेशाने निर्विवाद वर्चस्व! ​गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राजकीय भूकंप; बाजार समितीतील भाजप समर्थकांची संख्या १० वर ! ​ जळगाव | विशेष प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात ‘किंगमेकर’ मानले जाणारे संकटमोचक आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय जादू दाखवून दिली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चार दिग्गज संचालकांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने बाजार समितीच्या सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. या पक्षप्रवेशामुळे बाजार समितीमध्ये आता भाजपचे स्पष्ट बहुमत झाले असून, सत्तेच्या चाव्या भाजपकडे एकवटल्या आहेत. ​नाशिकमध्ये रंगला सत्तांतराचा सोहळा ​नाशिक येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात हे राजकीय  घडामोडी घडल्या. गिरीश … - [सावदा शहरात इफ्तार रोजा पार्टीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश](https://khandeshtimes.in/11440/): सावदा शहरात इफ्तार रोजा पार्टीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश जिलानी मिशन ग्रुपच्या पुढाकारातून आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती सावदा,  : पवित्र रमजान महिन्यानिमित्त सावदा शहरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार रोजा पार्टीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला. शहरातील विविध राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील रोजेदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोजा सोडत एकात्मतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला. या कार्यक्रमात रोजेदारांसाठी शरबत, मॅंगो ज्यूस, विविध फळे, खजूर तसेच शेव-चिवडा, लाडू, भजी, समोसा आणि इतर फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व आयोजनाची जबाबदारी शहरातील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या जिलानी मिशन ग्रुपने पार … - [टीम इंडियाच टी ट्वेंटी मध्ये "धुरंधर"  ! ; न्युझीलँडचा धुव्वा !](https://khandeshtimes.in/11435/): टीम इंडियाच टी ट्वेंटी मध्ये “धुरंधर”  ! ; न्युझीलँडचा धुव्वा ! सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद ; तीन  T20 विश्वचषक नावावर अहमदाबाद ववृत्तसंस्था: भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना भारताने उभारलेल्या २५६ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ चा डाव अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर किवी फलंदाजांना टिकाव धरणे कठीण ठरले आणि अखेर भारताने टी-२० विश्वचषकावर आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन याने साकारलेल्या ‘विराट’ खेळीने भारताला भक्कम पाया मिळवून दिला. त्याला अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्या तुफानी … - [रोहित निकम यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव](https://khandeshtimes.in/11430/): रोहित निकम यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थे तर्फे नाशिक येथे सन्मान जळगाव, प्रतिनिधी पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिकतर्फे राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार सामाजिक कृतज्ञतेसाठी दिला जातो. नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात ७ मार्च रोजी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात रोहित निकम यांचे बंधू व न्यू सॉफ्टएड कॉम्प्युटरचे संचालक रितेश निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी … - [iMDAD ग्रुप फाउंडेशनकडून जकात-फित्रासाठी सहकार्याचे आवाहन](https://khandeshtimes.in/11427/): iMDAD ग्रुप फाउंडेशनकडून जकात-फित्रासाठी सहकार्याचे आवाहन जिल्हा स्तरावर गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी iMDAD ग्रुप फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या इज्तेमाई जकात उपक्रमासाठी नागरिकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अब्दुल अजीज सालार यांनी केले आहे. संस्थेच्या वतीने जकात, फित्रा व इतर देणग्यांद्वारे जमा होणारी रक्कम जिल्हा स्तरावर गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार १००, २००, ५०० किंवा १००० रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमातून समाजातील गरजू कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत … - [जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे भूमिपूजन](https://khandeshtimes.in/11423/): जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे भूमिपूजन महिला व बालकांच्या तक्रार निवारणासाठी आधुनिक सुविधा; सुमारे २.९७ कोटींच्या प्रकल्पास मंजुरी जळगाव : प्रतिनिधी महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे तत्पर निवारण करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ या नवीन इमारतीचे भूमिपूजन रविवारी जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात उत्साहात पार पडले. या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिला व बालकांसाठी एकाच ठिकाणी सुविधा जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये पीडित महिला व बालकांना एकाच छताखाली कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन तसेच पोलीस सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज … - [शिवमहापुराण कथेनिमित्त फैजपुर परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल](https://khandeshtimes.in/11420/): शिवमहापुराण कथेनिमित्त फैजपुर परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल 10 ते 16 मार्चदरम्यान सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत काही मार्गांवर वाहतूक बंद; पर्यायी मार्ग जाहीर फैजपुर : प्रतिनिधी पंडित  प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेनिमित्त फैजपुर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी काही मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ही अधिसूचना 10 मार्च ते 16 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. कार्यक्रमस्थळ परिसरात वाहनांना प्रवेशबंदी फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीतील अकलूद शिवार, गुरुकृपा पेट्रोल पंपाच्या … - [अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती](https://khandeshtimes.in/11415/): अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव  पाटील यांची नियुक्ती अमळनेर : अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी गुलाबराव काशिनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.  एकनाथ शिंदे  यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना सचिव मा. संजय मोरे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र आज शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्राप्त झाले. याचबरोबर उपजिल्हाप्रमुख पदी माजी तालुकाप्रमुख प्रथमेश मधुकर पवार आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी माजी तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांची तसेच शिवसेना शहरप्रमुख पदी प्रथमच दोन तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये विलास सुकदेव कंखरे (पैलाड) व भरत प्रकाश पवार … - [‘गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील](https://khandeshtimes.in/11409/): ‘गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील ‘जनता शासनाच्या दारी नाही… शासनच जनतेच्या दारी’; महसूल समाधान शिबिरातून १२९० लाभार्थ्यांना थेट लाभ जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभे करताना ‘रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा’ हा विचार पुढे ठेवला होता. त्याच विचारातून आज शासन जनतेच्या दारी पोहोचत आहे. एखाद्या गरीब आईला तिच्या मुलासाठी दाखला मिळणे, शेतकऱ्याचा जमीन प्रश्न सुटणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुल मिळणे या आनंदातूनच शासनाच्या कामाचे खरे समाधान मिळते. गोरगरिबांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असून सेवा करण्यासाठीच आपले जीवन आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भोकर व आसोदा येथे आयोजित ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या शुभारंभप्रसंगी ते … - [काव्यरत्नावली चौकात विश्वचषक अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण](https://khandeshtimes.in/11406/): काव्यरत्नावली चौकात विश्वचषक अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण आमदार सुरेश भोळे व युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम; डीजे, पंजाबी ढोल व आतषबाजीची रंगत जळगाव प्रतिनिधी २०-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत भारत – न्यूझीलंड या संघांत होणार असून या लढतीचा थरार जळगावकरांना मोठ्या पडद्यावर देखील पाहावयास मिळणार आहे. आमदार सुरेश भोळे, युवाशक्ती फाउंडेशन व शौर्यवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विज्ञानाने या अंतिम लढतीचे थेट प्रक्षेपण काव्यरत्नावली चौक येथे दाखविले जाणार आहे. तिरंगा ध्वज, सेल्फी पॉइंट, डिस्को जॉकी, आदी व्यवस्था करण्यात आली आहे. देशात सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची धूम असून या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघात होणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्याची … - [मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल पुरवठा करणारे रॅकेट उघड; सात जणांना अटक](https://khandeshtimes.in/11403/): मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल पुरवठा करणारे रॅकेट उघड; सात जणांना अटक जिल्हापेठ पोलिसांची कारवाई; ८ पिस्टल, १० जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल आणून जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे तसेच एक दुचाकी असा एकूण सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३/२५ अन्वये १ मार्च २०२६ रोजी पहाटे १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे … - [अनधिकृत होर्डिंग प्रकरणी भंगाळे गोल्डला पुन्हा दंड](https://khandeshtimes.in/11400/): अनधिकृत होर्डिंग प्रकरणी भंगाळे गोल्डला पुन्हा दंड तीन दिवसांत दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा जळगाव : शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली असून भंगाळे गोल्ड या आस्थापनाला ६० हजार १८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तीन दिवसांच्या आत हा दंड न भरल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची अंतिम नोटीसही बजावण्यात आली आहे. यापूर्वी शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल रूपालीच्या बाहेरील अनधिकृत होर्डिंग तसेच एलईडी स्क्रीनचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी थेट तक्रार करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित हॉटेल मालकांवर कारवाई करत ६० हजार १८० रुपयांचा दंड … - [रमजानमध्ये सुकामेव्याला मागणी वाढली; युद्धामुळे दरात उसळी](https://khandeshtimes.in/11397/): रमजानमध्ये सुकामेव्याला मागणी वाढली; युद्धामुळे दरात उसळी बाजारपेठा बहरल्या; खजूर, अंजीर, पिस्ता, बदामाची खरेदी वाढली जळगाव : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये सुकामेव्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असून विविध प्रकारच्या सुकामेव्याला चांगली मागणी निर्माण झाली आहे. रोजा (उपवास) सोडताना खजूर व इतर सुकामेवा खाण्याची परंपरा असल्यामुळे या काळात बाजारपेठेत ग्राहकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा रमजानच्या सुरुवातीला सुकामेव्याचे दर तुलनेने स्थिर होते, मात्र अमेरिका, इराण तसेच आखाती देशांमधील सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयात प्रभावित होऊन काही प्रकारच्या सुकामेव्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांकडून दिवसभर उपवास केल्यानंतर इफ्तारच्या वेळी खजूर आणि सुकामेव्याचा वापर … - [मालेगावजवळ भीषण अपघात; मुक्ताईनगरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू](https://khandeshtimes.in/11394/): मालेगावजवळ भीषण अपघात; मुक्ताईनगरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू चार वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश; तिघे गंभीर जखमी उमराणे (जि. नाशिक) / मुक्ताईनगर : प्रतिनिधी मालेगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी सर्वजण सातोड (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत. या अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (वय ३५), त्यांचा मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (वय ४) आणि अंकिता संजय नाफडे (वय १९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (वय ५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा … - [आरटीओ फिटनेस व लायसन्स चाचणी ट्रॅकवरील सुविधांचा अभाव; मनसेचे निवेदन](https://khandeshtimes.in/11391/): आरटीओ फिटनेस व लायसन्स चाचणी ट्रॅकवरील सुविधांचा अभाव; मनसेचे निवेदन पाणी, शेड व स्वच्छतागृहाची मागणी; ८ दिवसांत तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आरटीओ विभागाच्या वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक तसेच कायमस्वरूपी लायसन्स चाचणी ट्रॅकवर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ट्रॅकवर दररोज शेकडो वाहनचालक व … - [महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!](https://khandeshtimes.in/11388/): महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी! महापौरांकडे निधी फाऊंडेशनची मागणी : महिला स्नेही शहरासाठी सदैव तत्पर जळगाव शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय असून महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी विशेषतः बाजारपेठेत महिलांसाठी सुसज्ज व सुरक्षित ई-टॉयलेट्स किंवा फिरती स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशी मागणी निधी फाऊंडेशनतर्फे महापौर दीपमाला काळे यांच्याकडे करण्यात आली. निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली सूर्यकांत विसपुते यांनी नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांची भेट घेऊन अभिनंदन केले आणि निवेदन दिले. प्रसंगी हेतल पाटील, यश विसपुते आदी उपस्थित होते. निधी फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात … - [उन्मेष पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश](https://khandeshtimes.in/11385/): उन्मेष पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांसह पक्षात प्रवेश जळगाव : उबाठा गटाचे जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शेकडो समर्थकांसह आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उन्मेष पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना खान्देशात शिवसेना घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. उन्मेष पाटील यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती व माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, माजी नगरसेवक चंदू तायडे, … - [राज्यात ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर](https://khandeshtimes.in/11381/): राज्यात ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर पीक कर्जावर २ लाखांपर्यंत माफी; नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी … - [संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश](https://khandeshtimes.in/11378/): संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश जरीन शेख व गौरी सूर्यवंशी यांना ९४ गुण; राज्यस्तरीय परीक्षेत अव्वल कामगिरी चाळीसगाव : प्रतिनिधी रविकिर्ती संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संस्कृत मेधा शोध परीक्षा (इयत्ता ९ वी) २०२५–२६ चा निकाल जाहीर झाला असून चाळीसगावच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय कन्या शाळेची विद्यार्थिनी जरीन गफ्फार शेख आणि अभिनव शाळेची गौरी विनोद सूर्यवंशी यांनी १०० पैकी ९४ गुण मिळवत अव्वल कामगिरी केली. चाळीसगाव येथील अनुपम संस्कृत केंद्रातून एकूण ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राष्ट्रीय कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी तरटे सरांचे मार्गदर्शन लाभले. … - [आरटीओ ट्रॅकवर कामगाराचा चक्कर येऊन अचानक मृत्यू](https://khandeshtimes.in/11363/): आरटीओ ट्रॅकवर  कामगाराचा चक्कर येऊन अचानक मृत्यू खान्देश टाइम्स न्यूज l जकी अहमद l ०५ मार्च २०२६ l जळगाव l शहरातील आरटीओ कार्यालय परिसरात काम करणाऱ्या एका एजंटचा अचानक मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. चक्कर येऊन खाली कोसळल्याने अफसर खान अजमल खान (वय ४१, रा. मिल्लत नगर, फैजपूर, ता. रावेर, जि. जळगाव) यांचे दुर्दैवी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अफसर खान अजमल खान यांना सुमारे वर्षभरापूर्वी ब्रेन हॅमरेजचा झटका आला होता. त्यानंतरही ते ६ महिन्यांनी जळगाव येथील आरटीओ कार्यालयातील वाहन चाचणी ट्रॅकवर काम करत होते. गुरुवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे ट्रॅकवर वाहन काढण्यासाठी आले असता त्यांना अचानक चक्कर येऊ लागली. त्यानंतर त्यांना … - [रमजान महिना : संवेदनांची सिंचन करणारा महिना - सुहेल अमीर शेख](https://khandeshtimes.in/11356/): जळगाव l रमजान मुबारक हा केवळ भूक आणि तहान सहन करण्याचा महिना नाही; तर तो मनुष्याच्या अंतरंगाला जागवणारा, हृदयात संवेदना निर्माण करणारा आणि समाजातील दुर्बल घटकांच्या वेदना जाणण्याची प्रत्यक्ष शिकवण देणारा महिना आहे. हा महिना दया, क्षमा आणि मुक्तीचा संदेश घेऊन येतो. म्हणूनच त्याला ‘माहे-मुवासात’ आणि ‘शहर-ए-कुरआन’ असेही म्हटले जाते. पण प्रत्यक्षात रमजानचा सर्वात मोठा धडा म्हणजे संवेदनांची सिंचन आहे— अशी संवेदना जी माणसाला स्वतःच्या ताटावरून उठवून एखाद्या भुकेल्याच्या दारापर्यंत घेऊन जाते; जी समृद्ध अवस्थेत असतानाही गरिबांच्या वेदना जाणवू देते. हीच ती भावना आहे जी स्वतःच्या परीक्षेत संयम शिकवते, पण इतरांच्या दुःखावर अस्वस्थ आणि व्याकुळ करते. दिवसभराची भूक आणि तहान … - [नेपानगर येथे ट्रान्सफार्मरमधून तांब्याची वायरची चोरी; यावलच्या शफी खाटीकसह ७ आरोपी अटक](https://khandeshtimes.in/11352/): नेपानगर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची वायर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, ७ आरोपींना अटक नेपानगर (बुरहानपूर) l प्रतिनिधी l शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील महागड्या तांब्याच्या कॉइल्स (तारा) चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा नेपानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीच्या ७ सदस्यांना अटक केली असून, यामध्ये चोरीचा माल विकत घेणाऱ्या जळगावच्या एका भंगार व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या टोळीने गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात ६८ ट्रान्सफॉर्मरमधून चोरी केली असून, यामुळे वीज कंपनीचे सुमारे १.७० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी होती चोरीची पद्धत : महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले हे आरोपी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने चोऱ्या करायचे. * रेकी: दिवसा दुचाकीवरून फिरून … - [जळगाव शहरातील ११ मुख्य चौकांचे रूप पालटणार? सुशोभीकरणासाठी नितीन लढ्ढा यांचे पत्र](https://khandeshtimes.in/11347/): जळगाव l प्रतिनिधी l ११ फेब्रुवारी l शहरातील सौंदर्यात भर टाकण्यासाठी दुभाजक आणि चौकांच्या सुशोभीकरणाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन बालमुकुंद लढ्ढा यांनी महापौर आणि आयुक्तांना पत्र लिहून शहरातील अत्यंत दुरावस्था झालेल्या ११ प्रमुख चौकांचे तातडीने सुशोभीकरण करण्याची मागणी केली आहे. काय आहे पत्रातील मुख्य मागणी? शहरातील दुभाजक सुशोभीकरणाचे काम सध्या विविध संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे, ज्याचे स्वागत करतानाच लढ्ढा यांनी शहरातील प्रमुख चौकांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक चौकांची अवस्था सध्या बिकट आहे. या चौकांचे सुशोभीकरण लोकसहभागातून किंवा महानगरपालिकेद्वारे तातडीने होणे गरजेचे आहे. सुशोभीकरणासाठी … - [मोठी बातमी : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री](https://khandeshtimes.in/11343/): अजित पवारांच्या निधनानंतर सोपवली महत्त्वाची जबाबदारी खान्देश टाइम्स न्यूज l मुंबई l ३१ जानेवारी २०२६ l राज्याच्या राजकारणातील एक मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या नियुक्तीमुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राजकीय घडामोडींचा वेगवान प्रवास शपथविधीपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वसंमतीने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेतेपदी निवड होताच त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला. … - [प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार - ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांचा इशारा](https://khandeshtimes.in/11339/): जळगाव l प्रतिनिधी l निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी, प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नेमके प्रकरण काय? नुकतीच निवडणूक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे समोर आले होते. या यादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळा असणे, प्रभागात राहत नसतानाही नावे नोंदवणे आणि संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करणे असे प्रकार उघडकीस आले होते. ॲड. पियूष पाटील … - [प्रभाग २ मध्ये सौ. शुभांगी अक्षय सोनवणे यांचे 'बॅट' सुसाट](https://khandeshtimes.in/11334/): प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जनसागराचा प्रतिसाद जळगाव l प्रतिनिधी l जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थांबली. प्रभाग क्र. २ (ब) मधील अपक्ष उमेदवार सौ. सोनवणे शुभांगी अक्षय यांच्या प्रचाराने आज कळस गाठला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या रॅलीमध्ये महिला आणि युवकांचा अलोट प्रतिसाद पाहता, विरोधकांच्या गोटात चांगलीच धास्ती निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे. महिला व युवकांचा ‘बॅट’ला वाढता पाठिंबा सकाळपासूनच प्रभागात शुभांगी सोनवणे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः महिला बचत गटातील महिलांनी आणि स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी ‘बॅट’ हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे. “आपला प्रभाग, आपला विकास” आणि “परिवर्तनासाठी एक मत” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला … - [प्रभाग ५ पियूष पाटील यांच्या रॅलीने उडवला प्रचाराचा धुरळा](https://khandeshtimes.in/11331/): ‘जनसागरा’मुळे विरोधकांचे धाबे दणाणले जळगाव l प्रतिनिधी l प्रभाग ५ च्या निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहोचला असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अपक्ष उमेदवार पियूष नरेंद्र पाटील यांनी काढलेल्या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. ही केवळ रॅली नसून एक अभूतपूर्व ‘जनसागर’ असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आणि पियूष पाटील यांच्यातील ही लढत आता खऱ्या अर्थाने ‘काटे की टक्कर’ ठरत असली, तरी मैदानातील वाढता पाठिंबा पाहता जनमत पियूष पाटील यांच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. ऐतिहासिक रॅली आणि अफाट जनसमुदाय प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पियूष पाटील यांनी आपल्या ‘कपबशी’ या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी शहरातून भव्य रॅली काढली. या रॅलीत … - [प्रभाग १२ 'अ' मध्ये इंजि. नितीश कापडणे यांच्या प्रचाराचा झंझावात](https://khandeshtimes.in/11328/): नागा साधूंचा आशीर्वाद अन् शिवरायांच्या साक्षीनं विकासाचा निर्धार! जळगाव I प्रतिनिधी l प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधील अपक्ष उमेदवार इंजि. नितीश कैलास कापडणे (निशाणी: फुगा, अनुक्रमांक: ३) यांच्या निवडणूक प्रचाराने आता निर्णायक वळण घेतले आहे. ‘सुशिक्षित नेतृत्व, सुरक्षित प्रभाग’ असा नारा देत इंजि. कापडणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, आज ओमकारेश्वर मंदिर येथून श्रीफळ वाढवून त्यांच्या भव्य प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. नागा साधूंच्या आशीर्वादाने रॅलीत संचारले चैतन्य प्रचार रॅली सुरू असतानाच एक विलक्षण योग जुळून आला. प्रयागराजकडे मार्गस्थ होत असलेल्या नागा साधू महाराजांनी रॅलीचा उत्साह पाहून आपला ताफा थांबवला. यावेळी त्यांनी आवर्जून इंजि. नितीश कापडणे यांच्या पाठीवर कौतुकाची … - [प्रभाग ४ 'अ' मध्ये भाजपला धक्का; निष्ठावंतांची मुलगी हिरकणी बागरे यांची अपक्ष म्हणून मैदानात उडी!](https://khandeshtimes.in/11324/): जळगाव l प्रतिनिधी l स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग ४ ‘अ’ मध्ये आता राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपची उमेदवारी नाकारल्याने, युवा आणि उच्चशिक्षित उमेदवार हिरकणी जितेंद्र बागरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उडी घेतली आहे. ‘टूथब्रश’ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्यांनी प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. निष्ठावंतांना डावलल्याने समर्थकांत नाराजी हिरकणी बागरे यांचे वडील जितेंद्र बागरे हे दीर्घकाळापासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “पक्षनिष्ठा असूनही डावलले गेल्याने, आता जनतेच्या कौलासाठी आम्ही मैदानात आहोत,” अशी भूमिका बागरे … - ["जनतेचा कौल, धीरज सोनवणे यांचा विजय निश्चित!"](https://khandeshtimes.in/11321/): जळगाव l प्रतिनिधी l निवडणूक प्रचाराने आता जोर धरला असून प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आणि माजी नगरसेवक धीरज मुरलीधर सोनवणे यांनी आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. दांडगा अनुभव आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आगामी कार्यकाळाचा ‘विकास आराखडा’ मांडला आहे. केलेल्या कामांची पावती आणि भविष्याचा संकल्प माजी नगरसेवक म्हणून काम करताना धीरज सोनवणे यांनी प्रभागात रस्ते, पाणी आणि पथदिव्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. “केलेली कामे ही माझी ओळख आहे आणि उर्वरित कामे पूर्ण करणे हे माझे ध्येय आहे,” असे त्यांनी प्रचारादरम्यान नमूद केले. आगामी ५ वर्षांसाठी त्यांनी प्रभागाचा विशेष … - [प्रभाग ६ 'मशाल'मय! धीरज सोनवणे यांना जनसागराचा विराट पाठिंबा](https://khandeshtimes.in/11318/): जळगाव l प्रतिनिधी l जनसंपर्क मोहिमेने प्रचारात आघाडी जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ६ ‘क’ मधील वातावरण आता पूर्णपणे ढवळून निघाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार धीरज मुरलीधर सोनवणे यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारली असून, त्यांच्या पदयात्रेला आणि भेटीगाठींना प्रभागातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. औक्षण आणि पुष्पवर्षाव: जणू विजयाचाच जल्लोष! धीरज सोनवणे जेव्हा प्रभागातील गल्लीबोळातून जात आहेत, तेव्हा त्यांचे स्वागत अत्यंत आत्मीयतेने केले जात आहे. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून त्यांचे औक्षण करून विजयासाठी आशीर्वाद दिले जात आहेत. तर काही ठिकाणी युवकांकडून आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला जात आहे. घराघरातून मिळणारा हा प्रतिसाद पाहता, प्रभागात ‘ठाकरे … - [चोपड्यात भाजपमध्ये ‘आयात’ नेत्यावरून धुसफुस; प्रभाकर सोनवणेंच्या घरवापसीमुळे निष्ठावंत आक्रमक](https://khandeshtimes.in/11313/): चोपड्यात भाजपमध्ये ‘आयात’ नेत्यावरून धुसफुस; प्रभाकर सोनवणेंच्या घरवापसीमुळे निष्ठावंत आक्रमक ​जळगाव: चोपडा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, ‘उबाठा’ गटाचे माजी उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. सोनवणे यांच्या या ‘घरवापसी’मुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांसह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना पुन्हा रेड कार्पेट दिले जात असल्याने महायुतीत अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ​प्रभाकर सोनवणे यांचा राजकीय प्रवास अत्यंत वादळी राहिला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मार्केट कमिटीचे संचालक म्हणून त्यांनी सुरुवात केली होती, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश … - [जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘विजयाचा शंखनाद](https://khandeshtimes.in/11310/): जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘विजयाचा शंखनाद महायुतीच्या रथयात्रेने शहर झाले भगवामय ​जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज महायुतीने आपले पूर्ण बळ झोकून देत अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी शहरातून भव्य ‘महाविजय रथयात्रा’ काढण्यात आली. या रथयात्रेने जळगाव शहराचा मुख्य भाग भगवामय करून टाकला असून, महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराला या निमित्ताने मोठी गती मिळाली आहे. निवडणुकीच्या या महासंग्रामात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहरात राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. ​रथयात्रेची सुरुवात शहराचे आराध्य दैवत आणि स्फूर्तीस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सजवलेल्या रथावर … - [प्रभाग १३ मध्ये गुलाबराव देवकर मैदानात; स्वाध्याय भवन परिसरात 'होम टू होम' प्रचारावर भर](https://khandeshtimes.in/11307/): प्रभाग १३ मध्ये गुलाबराव देवकर मैदानात; स्वाध्याय भवन परिसरात ‘होम टू होम’ प्रचारावर भर ​जळगाव (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता अंतिम टप्पा गाठला असून, प्रभाग १३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः मैदानात उतरत प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. गणपती नगरातील स्वाध्याय भवन परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संवाद साधला. या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान देवकर यांनी स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या आणि प्रभागाचा प्रलंबित विकास केवळ महायुतीच करू शकते, असा विश्वास व्यक्त केला. “प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे … - [मुख्यमंत्री जळगावात, पण आरटीओ गायब! देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची 'दांडी'](https://khandeshtimes.in/11304/): मुख्यमंत्री जळगावात, पण आरटीओ गायब! देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची ‘दांडी’ जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी येत असतानाच, शासकीय शिष्टाचाराला बगल देण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्याला जबाबदार विभागप्रमुख असलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) राजेंद्र वर्मा यांनी अचानक दांडी मारल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांची सभा आणि रोड शो आयोजित करण्यात आला आहे, मात्र या दौऱ्याच्या नियोजनातून प्रमुख अधिकारीच गायब असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक पाहता, कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या (VVIP) दौऱ्यामध्ये सुरक्षा पुरवण्याची मुख्य जबाबदारी … - [प्रभाग १३ मध्ये महायुतीचे 'शक्तीप्रदर्शन'; प्रफुल्ल देवकर यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद](https://khandeshtimes.in/11299/): प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तीप्रदर्शन’; प्रफुल्ल देवकर यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद जळगाव (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर चढू लागला असून, प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीने प्रचाराचा धडाका लावला आहे. महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्यासह संपूर्ण पॅनलने सोमवारी रायसोनी नगर येथून भव्य रॅली काढत विजयाचा निर्धार केला. प्रचाराचा श्रीगणेशा करताना उमेदवारांनी प्रारंभी विश्वेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले. त्यानंतर ‘हर हर महादेव’ आणि ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. या प्रचार फेरीमध्ये आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांनी स्वतः मतदारांशी संवाद साधला. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच महायुतीचे ध्येय असून रस्ते, नियमित पाणीपुरवठा, … - [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या जळगावात भव्य रोड शो ! ](https://khandeshtimes.in/11296/): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या जळगावात भव्य रोड शो !  जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने निर्णायक आघाडी घेण्याच्या दृष्टीने प्रचाराचा वेग वाढवला असून, या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोमुळे महायुतीच्या प्रचाराला नवी उर्जा मिळणार असून, शहराच्या राजकीय वातावरणात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. हा रोड शो दुपारी ठीक ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार असून, तो नेहरू चौक – लालबहादूर शास्त्री टॉवर – चित्रा चौक – गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत पुन्हा … - [यावल जबरी चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड; जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई](https://khandeshtimes.in/11292/): यावल जबरी चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड; जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई १७ लाख ३६ हजारांची रोकड हस्तगत; गुन्हेगारी जगतात खळबळ जळगाव (प्रतिनिधी): यावल परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छडा लावला असून, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. साहिल शहा सत्तार शहा (रा. धुळे) आणि अनस शहा अबुबकर शहा (रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत एकूण १७ लाख ३६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात यश मिळवले आहे. अशी झाली कारवाई: यावल येथील जबरी चोरीच्या घटनेनंतर एलसीबीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. यापूर्वी टोळीतील तीन … - [जळगावात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ ; आज पिंप्राळ्यात रवींद्र चव्हाण यांची तोफ धडाडणार!](https://khandeshtimes.in/11288/): जळगावात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ ; आज पिंप्राळ्यात रवींद्र चव्हाण यांची तोफ धडाडणार! ७५ उमेदवारांच्या विजयासाठी भवानी मंदिर परिसरातून फुंकले जाणार रणशिंग; दिग्गज नेत्यांची उपस्थिती जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीने आपल्या विजयाचा निर्धार पक्का केला आहे. आज, रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंप्राळा उपनगरात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. याच सभेतून महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ केला जाणार आहे. भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा प्रारंभ प्रचाराची सुरुवात पिंप्राळा येथील भवानी मंदिर परिसरातून होणार असून, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य … - [बिनविरोध निवडीचा फंडा निवडणूक आयोगाच्या रडारवर](https://khandeshtimes.in/11285/): बिनविरोध निवडीचा फंडा निवडणूक आयोगाच्या रडारवर जळगावसह राज्यातील महापालिकांमध्ये चौकशीचे आदेश मुंबई/जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेसह राज्यातील विविध महापालिकांमध्ये सत्ताधारी पक्षांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात ‘बिनविरोध’ निवडून येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. या बिनविरोध निवडींमागे दबाव, जबरदस्ती किंवा आर्थिक प्रलोभन तर नाही ना? याची पडताळणी करण्यासाठी आयोगाने त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, अहवाल मिळेपर्यंत या जागांची अधिकृत घोषणा रोखली आहे. जळगावमधील या जागांसह राज्यातील सुमारे ६३ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडी आता ‘स्कॅन’ केल्या जाणार आहेत. तीन यंत्रणांकडून स्वतंत्र चौकशी निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून निवडणूक वैध ठरवली जाणार नाही. संबंधित महापालिकेचे … - [जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीची ऐतिहासिक कामगिरी !](https://khandeshtimes.in/11279/): जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीची ऐतिहासिक कामगिरी ! चक्क १२ जागांवर बिनविरोध विजय ; कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. राजकीय चाणक्यनीतीचा वापर करत महायुतीने चक्क १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी प्रत्येकी ६ जागा जिंकत विजयाचा समसमान वाटा उचलला आहे. ७५ जागांच्या महापालिकेत आता केवळ ६३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार असून, मतदानापूर्वीच महायुतीने ‘डझनभर’ विजयांचा टप्पा ओलांडल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष पाहायला मिळत आहे. असा रंगला बिनविरोध विजयाचा थरार निवडणुकीच्या प्रारंभीच भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे … - [जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीची ऐतिहासिक कामगिरी !](https://khandeshtimes.in/11276/): जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीची ऐतिहासिक कामगिरी ! चक्क १२ जागांवर बिनविरोध विजय ; कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. राजकीय चाणक्यनीतीचा वापर करत महायुतीने चक्क १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी प्रत्येकी ६ जागा जिंकत विजयाचा समसमान वाटा उचलला आहे. ७५ जागांच्या महापालिकेत आता केवळ ६३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार असून, मतदानापूर्वीच महायुतीने ‘डझनभर’ विजयांचा टप्पा ओलांडल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष पाहायला मिळत आहे. असा रंगला बिनविरोध विजयाचा थरार निवडणुकीच्या प्रारंभीच भाजपच्या गायत्री बेंडाळे … - [शिवसेना (शिंदे गट)चे प्रभाग २ (अ) मधून सागर सोनवणे बिनविरोध](https://khandeshtimes.in/11273/): प्रभाग २ (अ) मधून सागर सोनवणे बिनविरोध जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीची विजयी घोडदौड सुरूच असून, प्रभाग क्रमांक २ (अ) मधून शिवसेनेचे सागर शामकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सागर सोनवणे यांचा विजय निर्विवाद ठरला असून, महायुतीसाठी हा सातवा मोठा विजय मानला जात आहे. आज २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. प्रभाग २ (अ) मध्ये सागर सोनवणे यांच्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. या यशस्वी राजकीय खेळीमुळे शिवसेनेने जळगावच्या मैदानात आपली … - [जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीचा 'विजयी षटकार'; प्रभाग ७ ‘क’ मधून भाजपचे विशाल भोळे बिनविरोध](https://khandeshtimes.in/11268/): जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीचा ‘विजयी षटकार’; प्रभाग ७ ‘क’ मधून भाजपचे विशाल भोळे बिनविरोध जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखला असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयाचा ‘षटकार’ लगावला आहे. प्रभाग क्रमांक ७ ‘क’ मधून भाजपचे उमेदवार विशाल सुरेश भोळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ताज्या यशामुळे ७५ जागांच्या महापालिकेत महायुतीचे आतापर्यंत ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात शिवसेना (शिंदे गट) ४ तर भाजपच्या २ उमेदवारांचा समावेश आहे. महापालिकेच्या ७५ जागांसाठी आज, २ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर … [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)