Love इन पार्टनरची भांडणातून अशी केली हत्या.

मुंबई : सतत होणाऱ्या भांडणांमुळे लिव्ह इन पार्टनरची गळा चिरून हत्या करण्याची घटना रविवारी रात्री अंधेरीत घडली . हा गुन्हा करून मारेकरी पळून जाण्याच्या तयारीत असताना पनवेल लोहमार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले . त्यानंतर त्याला डी . एन . नगर पोलिसांच्या ताब्यात दिले . अंधेरीच्या गावदेवी डोंगर येथील झोपडपट्टी परिसरात हसन पठाण ( २४ ) आणि नेहा गुप्ता ( २० ) हे लिव्ह इनमध्ये राहत होते . पठाण हा सुतारकाम करतो . मात्र त्यांच्यात लहानमोठ्या कारणावरून सतत वाद व्हायचे .

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारासदेखील त्यांच्यात भांडणझाले . तेव्हा रागाच्या भरात त्याने धारदार चाकूने नेहाची गळा चिरून हत्या केली . त्यानंतर तो घटनास्थळाहून पसार झाला . रेल्वेने तो पनवेलला पोहोचला तेव्हा लोहमार्ग पोलिसांनी त्याला पाहिले . त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली . त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली . याबाबतची माहिती लोहमार्ग पोलिसांनी डी . एन . नगर पोलिसांना दिली . पोलिसांनी नेहाचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठविला . तसेच पठाणवर गुन्हा दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published.