LPG गॅस वरील बंद झालेली सबसिडी, पुन्हा सरकारने चालू केली. जनतेसाठी आंनदाची बातमी.

घरगुती गॅसवरील सबसिडी पुन्हा सुरु केंद्र सरकारने घरगुती गॅसवरील सबसिडी पुन्हा सुरू केली आहे . कोरोनाकाळात अनेक महिन्यांपासून सबसिडी बंद होती . मात्र , आता ग्राहकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहेत . सध्या वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याने नेमकी किती सबसिडी दिली आहे , हे स्पष्ट नाही . गेल्या काही महिन्यांत घरगुती सिलिंडरचे दर दुपटीने वाढले आहेत .

गेल्या काही महिन्यांमध्ये LPG गॅस वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना सबसिडी मिळणं बंद झालं होतं या बाबात अनेक तक्रारी होत्या मात्र आता पुन्हा सबसिडी सुरू झाल्यानंतर या तक्रारी येणे काही प्रमाणात बंद झाले आहे . दरम्यान LPG एलपीजी गॅस ग्राहकांना प्रति सिलिंडर ७ ९ .२६ रुपये अनुदान म्हणून दिले जात आहे .

ग्राहकांना सबसिडी अनुदानची रक्कम वेगवेगळ्या असल्याने यामुळे नक्की किती सबसिडी मिळतेय याबद्दल ग्राहक संभ्रमात आहेत . काही ग्राहकांना ७ ९ .२६ रुपये सबसिडी मिळत आहे . तर काहींना १५८.५२ रुपये किंवा काहींना २३७.७८ रुपये सबसिडी मिळत आहे . यामुळे LPG घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना सबसिडी नेमकी किती असा प्रश्न पडला आहे .

सर्व प्रथम LPG गॅस च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या व www.mylpg.in या संकेतस्थळावर लॉग ऑन करा , लॉग ऑन केल्यावर स्क्रीनच्या उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल यानंतर येथे तुम्ही तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा , स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल जी तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची असेल , आता वरच्या उजवीकडे साइन – इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर क्लिक करा , New User वर क्लिक करून वेबसाइटवर लॉग इन करू शकता समोर असलेल्या View Cylinder Booking History वर क्लिक करा , तुम्हाला कोणत्या सिलिंडरवर किती सबसिडी दिली गेली आणि कधी दिली गेली याची संपूर्ण माहिती स्क्रीन वर दिसेल .
सबसिडी बंद च्या तक्रारी का वाढता … एलपीजीवरील LPG सबसिडी बंद होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एलपीजी आधारला लिंक न करून ठेवणे , ग्राहकांची सबसिडी बंद होण्यामागे हे ठोस कारण असू शकतं .

 

Leave a Reply

Your email address will not be published.