LPG सिलिंडरच्या किमतीमध्ये झाले मोठे बदल वाचा सविस्तर माहिती

शेअर करा.

मुंबई : जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या : वाढत असलेल्ये किमतींमुळे मागच्या काही महिन्यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती . परंतु , आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी LPG सिलिंडरच्या किमतीत कपात केलेली आहे .१९ किलोचा एलपीजी सिलिंडर हा १ जानेवारी २०२२ रोजी १०२ रुपयांनी स्वस्त झालेला आहे . घरगुती वापरात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमती या स्थिर आहेत .

 

पेट्रोलियमच्या कंपन्यांनी शनिवारी सिलिंडरच्या किमतींचा संपूर्ण आढावा घेतला . यानुसार १ ९ किलोच्या वाणिज्य वापराच्या LPG सिलिंडरच्या किमतीमध्ये १०२ रुपयांची कपात करण्यात आलेली आहे .यानुसार मुंबईत आता १ ९ किलो सिलिंडरचा भाव १ ९ ४८.५० रुपये इतका झाला आहे . दिल्लीत तो १ ९९ ८.५० रुपये इतका झालेला आहे . चेन्नईमध्ये १ ९ किलोच्या गॅसकरीता २१३१ रुपये व , कोलकात्यात २०७६ रुपये इतका दर असेल , असे INDIAN OIL कॉर्पोरेशनने म्हटलं आहे .

 

या आधीच सलग २ महिने १ ९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीतमध्ये मोठी वाढ झालेली होती . नोव्हेंबर महिन्यात वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत जवळपास २६६ रुपयांची वाढ करण्यात आली होती . व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये हा सिलिंडर अजून १०० रुपयांनी महागला होता . आता यापुढेचा इंधन दर आढावा १ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply