omicron ची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत तब्बल दीड लाखावर पोचली

नवी दिल्ली : संपूर्ण जगात ओमायक्रॉनचे १ लाख ५१ हजार ३६८ रुग्ण आढळून आले असून त्यातील २६ जणांचा मृत्यू झाला . हा नवा विषाणू १०८ देशांमध्ये पूर्णपणे पसरला आहे . इंग्लंड , डेन्मार्क , कॅनडा , नॉर्वे , जर्मनी , दक्षिण आफ्रिका , फ्रान्स , ऑस्ट्रेलिया , इस्टोनिया या दहा देशांत ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे

अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी कळवलेली आहे नैसर्गिक संसर्गानंतर किंवा लसीमुळे निर्माण झालेली प्रतिकार स्वरूपाची शक्ती , तसेच अँटिबॉडीज उपचार या कशालाही ‘ ओमायक्रॉन ‘ दाद न देण्याची शक्यता असल्याचे कळत आहे त्यामुळे दक्षता ही बाळगावी लागणारच नेचर नियतकालिकात संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला आहे .

त्याप्रमाणे , ‘ ओमायक्रॉन वर मात करण्यासाठी नव्या लसी आणि उपचार शोधणे आवश्यक आहे . कोलंबिया व हाँगकाँग विद्यापीठांतील संशोधकांनी संगीतले आहे की , ‘ ओमायक्रॉन’च्या स्पाइक प्रोटिनमध्ये होणाऱ्या अनेक परिवर्तनांमुळे तो सध्याच्या सर्व लसिल वरती उपचार निष्प्रभ करू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published.