omicron च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात महापालिकेने लागू केले नवीन निर्बंध, पेट्रोलला देखील लावली बंदी.

शेअर करा.

Khandesh times News जळगाव : संपूर्ण देशात आता ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे ( Omicron Variant )खळबडी चे वातावरण निर्माण झाले आहे . त्यामुळे शासनातर्फे कोरोनाomicron लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे . जळगाव शहरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांचे प्रमाण अजून देखील कमी आहे . लसीकरणाचा टक्का वाढवण्याकरीता महापालिकेने कठोर अशी पावले उचलायला सुरुवात केली असल्याचे दिसत आहे . दोघ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणार्‍यांना पेट्रोल व खरेदीसाठी दुकानात प्रवेश द्यावा , याप्रकारचे आदेश मनपाने काढले आहेत . शहरातील सर्व व्यापारी संकुलांच्या अध्यक्षांसह पेट्रोलपंप चालकांना या अनुषंगाने नोटीस बजावण्यात आलेली आहे . नियम न पाळणाऱ्यांना ५० हजारांचा दंड आकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे .

 

शहरामधील बँका , हॉटेल , मॉलसोबत इतर मोठ्या दुकानांमध्येही लसीकरण प्रमाणपत्राविना प्रवेश मिळणार नाही . मनपाने तयार केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ज्या अस्थापनांकडून केली जाणार नाही , त्या आस्थापना मालकांवर मनपाकडून मोठी कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे . यामध्ये १० ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे . विशेष म्हणजे ग्राहक , वाहनधारकांकडून लसीकरणाचे प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी देखील संबधित असणाऱ्या आस्थापना मालकांवर देण्यात आली आहे .

 

जिल्हा प्रशासन आणि मनपाने काढलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीकरिता मनपा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे . यासाठी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांसोबत मनपाच्या इतर अधिकाऱ्यांवर देखील ही जबाबदारी देण्यात आलेली आहे . यासाठी विशेष अशा पथकांची नियुक्ती देखील मनपा प्रशासनामार्फत करण्यात आल्याचे कळाले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply