omicron ला फुटले फाटे, रुग्णांची संख्या पोहचली ३२५ ला

शेअर करा.

नवी दिल्ली : देशात गुरुवारी  omicron चे ६४ नवे रुग्ण आढळून आले आहे . तामिळनाडूमध्ये ३३ , तेलंगणात १४ , कर्नाटकात १२ , केरळमध्ये ५ नवे रुग्ण आढळल्याने या व्हायरसच्या रुग्णांची एकूण संख्या ३२५ वर पोहोचली . omicron १६ राज्ये , केंद्रशासित राज्यांमध्ये पसरला आहे . महाराष्ट्रात नवे २३ रुग्ण आढळल्याने omicron बाधितांचा आकडा हा ८८ इतका आहे . तमिळनाडूमध्ये  omicron चे बरेच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे . नव्या विषाणूच्या ५७ संशयास्पद रुग्णांपैकी ३३ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे झाले .

 

मध्य प्रदेशात रात्रीला लागेल संचारबंदी

 

omicron संसर्ग रोखण्याकरीता मध्य प्रदेशमध्ये रात्री ११ पासून ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे कळाले आहे . याची अमलबजावणी गुरुवारी रात्रीपासून सुरु झालेली आहे .

अशाच संचारबंदीचा निर्णय इतर राज्यातही घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply