OTP च्या बहाण्याने ६३ हजारांचा गंडा.

जळगाव : स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपी क्रमांक विचारून शिवकुमार रामसुंदर तिवारी ( वय ४५ , रा . एमआयडीसी , जळगाव ) यांना ६३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ओटीपी सांगताच पैसे झाले गायब:

एमआयडीसी परिसरातील रहिवासी शिवकुमार रामसुंदर तिवारी हे खासगी नोकरी करतात . त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे दोन क्रेडिटकार्ड आहेत . हे कार्ड वापरण्यासाठी त्यांना वार्षिक शुल्क लागत असल्याने त्यांनी २४ नोव्हेंबर रोजी कस्टमर केअरला कॉल करून हे शुल्क कमी लागावे , यासाठी विनंती केली होती . त्यानुसार २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.५२ वाजेच्या सुमारास तिवारी यांना एका कस्टमर केअर नंबरवरूनमहिलेचा कॉल आला . तिने ओटीपी मुझे बतो दो असे तिवारींना सांगितले . दरम्यान , तिवारी यांनी त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी त्या महिलेला सांगितला . त्यानंतर काही वेळातच तिवारी यांच्या दोन्ही कार्डमधून सुमारे ६३ हजार रुपये कपात झाल्याचा त्यांना मॅसेज आला .

Leave a Reply

Your email address will not be published.