Pubg ने घेतला एका मुलीचा जीव मुलीने केली आत्महत्या जामनेर येथील घटना काय घडला प्रकार वाचा संपूर्ण बातमी.

जामनेर- या शहरातील इयत्ता बारावीचे शिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात येऊन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक अशी घटना आज समोर आली या असून मुलीनं सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे . कुमारी नम्रता पद्माकर खोडके ( मूळ राहणार भराडी ) हल्ली मुक्काम जामनेर 12 वी च्या इयत्तेत शिकत असलेल्या वीस वर्षीय तरुणीने आज पब्जी खेळाच्या जाळ्यात अडकून एका स्टेपवर आत्महत्या केली आहे . या घटनेमुळे सगळीकडे खरबडी चे वातावरण निर्माण झाले आहे .

 

नम्रता हिचे वडील हे स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम करतात . तरुण मुलगी आत्महत्या केल्याने आई – वडिलांवर दुःखाचे आभाळ कोसळले . या मुलीचे वडील हे डॉक्टर के . एम . जैन यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत . त्यांच्या घराचे बांधकाम हे सुरू असल्याने या मुलीची आई वाकी रोडवर घरावर पाणी मारण्याच्या कामाने गेल्या होत्या . व त्याच वेळी वेळेला मुलीने हे कृत्य केले . याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत असल्याचे कळाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.