school bus यासाठी होणार करमाफी

शेअर करा.

मुंबई: कोविडमुळे शालेय विद्यार्थ्याची वाहतूक करीत असणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला . त्याचबरोबर , मुंबईमधिल ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामधून सूट देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलेला होता .

शाळांच्या मालकीच्या त्याबरोबर केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस , शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेमधिल मुलांना ने – आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी वार्षिक करामधून शंभर टक्के कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . ज्या स्कूल बस प्रकारातल्या वाहनांनी वरील कालावधीसाठीचा कर भरला असेल त्यांचा कर मोटार वाहन कर अधिनियमातील तरतुदीप्रमाणे आगामी काळात समायोजित करण्यात येईल .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply