बिग बॉस सीजन 13 चा विजेता तसेच बालिका वधू या शो मधील त्याच्या भूमिकेसाठी सर्वात प्रसिद्ध असलेला असा उत्तम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या केवळ ४० व्या वर्षी या अभिनेत्याचे अचानकपणे निधन झाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे. बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला होता . खतरो के खिलाडी , फिअर फॅक्टर या नावाजलेल्या शोमधून सिद्धार्थ झळकला होता . याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता . हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती .
आज कूपर इस्पितळातून त्याच्या निधनाच्या बातमीची पुष्टी देण्यात आली .अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती . यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही . त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले . यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे . आज या दुःखद बातमी मुळे संपूर्ण बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का पोहचला आहे .