Software इंजिनिअर असे उच्च शिक्षण झालेले सुध्दा हॅकर चा प्रेमात पडली, अनी 2 लाखात फसली.

शेअर करा.
Khandeshtimes News :

सोशल मीडियावरील ओळखीनंतर झालेल्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे . अशातच विवाहेच्छुकांच्या संकेतस्थळांवर असलेल्या माहितीची खातरजमा न करताच विश्वास ठेवणाऱ्या पाचोरा येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची अमेरिकेत असल्याचा बहाणा करणाऱ्या तरुणाने २ लाख ५५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे . या प्रकरणी निवांत चित्रे अशा नावाने संपर्क करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत असे की , पाचोऱ्याची रहिवासी ही तरुणी पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते . मराठी मेट्रेमनी साइटवर ती वर संशोधन करत होती . त्यासाठी साइटवर तिने आपला प्रोफाइल फोन क्रमांकासह अपलोड केला होता . त्या क्रमांकावरून ४ नोव्हेंबरला निवांत चित्रे असे नाव सांगणाऱ्या तरुणाने तिच्याशी संपर्क केला आणि लग्नाची बोलणीही केली .

आपण अमेरिकेतील ग्लासगो येथे राहत असल्याची बतावणी त्याने केली . प्राथमिक बोलणी झाल्यानंतर दोघांचा फोनद्वारे संपर्क वाढला होता . लग्नाचा निर्णय झाल्यानंतर त्या तरुणाने तिला भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले . त्यात सोन्याच्या बांगड्या , सोन्याचा हार , डायमंडचे घड्याळ व एक हजार पाऊंड युके चलन ज्याची भारतीय किमंत एक कोटी रुपये आहे , अशा वस्तू पाठवलेल्या आहेत . दिल्ली विमानतळावर कस्टम व जीएसटी शुल्क भरल्याशिवाय ते पार्सल मिळणार नाही , ‘ असं सांगून संशयिताने ४ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ५५ हजार ५०० रुपये ऑनलाईन घेतले .

या काळात ना पार्सल आले ना संबंधिताशी संपर्क झाला . पैसे परत मिळण्याचीही शक्यता नाही . आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली . या तक्रारीवरुन फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे अधिक तपास करत आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply