• Tue. Aug 16th, 2022

  South सुपरस्टार Punit Rajkumar यांचे हृदयविकाराने दुःखद निधन.

  ByKhandeshTimes

  Oct 30, 2021

  बेंगळुरू : साऊथ कडील फेमस सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं हार्ट अटॅकच्या झटक्याने निधन झालं आहे . पुनीत हे 46 वर्षांचे होते . त्यांचा बेंगळुरू येथील विक्रम रुग्णालयामध्ये उपचार सुरु होता .परंतु उपचार सुरू असतानाच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत बंद झाली .

   

  अभिनेता पुनीत राजकुमार यांचा सकाळी 11.30 वाजता छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते . त्यांच्यावर उपचार करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करत त्याचा जीव वाचावा याकरिता डॉक्टर अतोनात असे प्रयत्न करत होते . त्यांची प्रकृती ही अतिशय गंभीर होती . शेवट त्याची मृत्यूशी झुंज संपली व बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत असे घोषित केले .

   

  46 वर्षांचा पुनीत राजकुमार हे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होता . पुनीतने याने आपल्या एक्टिंग करिअरची सुरुवात एक बाल कलाकार म्हणून केली होती . 1985 ला तो ‘ बेट्टाडा होवू ’ या चित्रपटात दिसला होता . या भूमिकेकरीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले . याच बरोबर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता . ‘ सुवरत्थान ‘ हा चित्रपटात त्यांचा अखेरचे होते . त्यांच्या अनेक फिल्मसाठी त्यांची खूप वाहवा झाली होती . ‘ सुवरत्थान ‘ हा चित्रपट याच वर्षी थेटर मध्ये आलेला होता.

  Leave a Reply

  Your email address will not be published.