ST कर्मचाऱ्यांवर आत्ता होणार’ मेस्मा’ची कारवाई ,सरकारचा मोठा निर्णय..

मुंबई : मेस्मा कायदा हा अत्यावश्यक अशा सेवेकरिता लावला जातअसतो व एसटी ही अत्यावश्यक सेवेत मोडली जाते . संप करीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावायचा का , याप्रकरणी सरकार गंभीरपणे विचार करत आहे . लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कारवाई करू शकतील , हा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दिल्याचे कळाले आहे . संपा बाबत परब यांनी शुक्रवारी बैठक घेतली . त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकार हे कठोर पाऊल उचलण्याच्या मानसिकतेमध्ये नाही . पण आम्हाला जनतेचा देखील विचार करावा लागेल . कर्मचारी , अधिकारी , कायदेतज्ज्ञा यांच्याशी चर्चा केली . मेस्मा लावण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल . आतापर्यंतची केलेली कारवाई मागे घेता येणार नाही . या संपाला आता नेता नाहीच .

परंतु जो कुणी कर्मचाऱ्यांना भडकावत आहे त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल . विलीनीकरणाबाबत मुंबई हायकोर्टाने नेमलेली समिती याबाबतचा निर्णय घेईल . या समितीसमोर सरकार आणि विविध संघटना म्हणणे मांडत आहेत . समितीचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल मग त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील . तोपर्यंत कामगारांना चांगली पगारवाढ देत तसे लेख आदेश काढले . त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नचिन्हे येतच नाही , हे परब यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.