
जळगाव ;- राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसचेआमदारही फुटणार असल्याचा खळबळजनक दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते कुणाकडे येतील ते सांगता येणार नाही असंही ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसचेही आमदार तयारीत आहेत, सांगता येत नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. कुणाकडे येतील ते सांगता येणार नाही, पण येतील. ते येतील हे मी निश्चितपणाने ऐकलं आहे, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. अजित पवार हे भाजपसोबत येतील याबाबत कल्पना होती का? यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कुणालाच कल्पना नव्हती. मात्र, दोन महिन्यापूर्वीच तुम्हाला अंदाज सांगितलं होता, तो खरा ठरला असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. ते येतील याबाबत मला कुठलीही माहिती नव्हती, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.