
परिवहन विभागाची आढावा बैठक पार; रस्ता सुरक्षा, EV धोरण, व पीपीपी विकासावर चर्चा
मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील परिवहन विभागाच्या कामकाजाचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आज परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विभागाच्या विविध योजनांवर आणि धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान रस्ता सुरक्षा उपाययोजना, राज्यातील परिवहन विभागाच्या जागांचा पीपीपी (Public Private Partnership) तत्वावर विकास, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, वरळी (RTO) विभागाचा आढावा घेण्यात आला. वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) प्रक्रियेत गुणवत्ता वाढविणे आणि सुधारित दर आकारणी यावर विशेष भर देण्यात आला.
याशिवाय मंजूर अंदाजपत्रक २०२५-२६ चा खर्च, इलेक्ट्रिक वाहन धोरण (EV Policy), EV अनुदान, Aggregator Policy, तसेच Media Plan या विषयांवरही विचारमंथन झाले.
राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या माध्यमातून दर्जेदार, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सुविधा मिळाव्यात, यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विभागाच्या सर्व योजनांचा लाभ जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी पुढील धोरणात्मक पावले उचलण्याचे निश्चित करण्यात आले.





