
माहिती अधिकारात ‘दारिद्र्यरेषेखालील’ असल्याचा खोटा दावा; दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार
जळगाव: माहिती अधिकार अर्जाद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असलेले दीपककुमार गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीत ते दारिद्र्यरेषेखालील नसतानाही त्यांनी तसा खोटा दावा करून शासनाचा महसूल बुडवल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तक्रार सादर करण्यात आली आहे.
दीपककुमार गुप्ता यांनी एका माहिती अधिकार अर्जामध्ये आपण दारिद्र्यरेषेखालील असल्याचे नमूद करून माहिती मागवली होती. मात्र, सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी गुप्ता दारिद्र्यरेषेखालील नसल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्च २०२५ मध्ये एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली.
उपविभागीय अधिकारी, जळगाव यांच्या अहवालानुसार, चौकशीअंती दीपककुमार गुप्ता हे दारिद्र्यरेषेखालील नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांनी शासनाची फसवणूक करून मोफत माहिती मिळवली आणि महसूल बुडवला.
या प्रकरणाची पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ही तक्रार पुढे पाठवली असून, या प्रकरणावर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे यांच्या तक्ररीवरुन दिपककुमार गुप्तावर नियमोचीत कार्यवाही करण्यासाठी
राज्य माहिती आयुक्त खंडपीठ, नाशिक, यांच्या कडे दि:- ०३/०९/२०२५ रोजी( डॉ. गिरीष ठाकुर ) अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव. यांनी पत्र पाठवले ..





