Ukraine ला अडकले 8 भारतीय मराठी विद्यार्थी,सुटकेसाठी पाहत आहेत वाट.

शेअर करा.

KHANDESH TIMES NEWS : ” मी पुणे जिल्ह्यामधील शिरुर तालुक्याचा आहे . मी व माझे 8 मित्र आम्ही युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहोत . युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने आम्हाला आता भीती वाटत आहे . आम्ही अत्यंत पॅनिक झालोय कारण विमान वाहतूक देखील ठप्प झाली आहे . ” सुशांत शितोळे या विद्यार्थ्याने BBC मराठीशी बोलताना आपल्या भावना सांगितल्या .

रशियाने युक्रेनवरती लष्करी कारवाई हि सुरू केली व युक्रेनमध्ये राहत असलेल्या भारतीयांची चिंता वाढली . विशेषतः शिक्षणाकरिता युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी संकटात सापडले आहेत . युक्रेनमधील खारकीव्ह या शहरामधील खारकीव्ह विद्यापीठात सुशांत शितोळे शिकत आहे . सुशांतसोबत महाराष्ट्र मधील अजून 8 विद्यार्थी आहेत असं त्याने सांगितलं . त्यांपैकी दोन मुली आहेत . महत्त्वाचं असं की खारकीव्ह रशियाच्या सीमेलगत आहेत . त्यामुळे भारतीय दूतावासाने या विद्यार्थ्यांना खारकीव्ह तात्काळ सोडा असं सांगण्यात आले आहे .

खारकीव्हमध्ये अंतर्गत वाहतूक ही पूर्णपणे बंद असल्याने आम्ही येथून कुठेही जाऊ शकत नाही . आम्ही आत्ता काय करावं कळत नाही . ” असंही सुशांत शितोळेने बोलताना सांगितलं आहे . खारकीव्ह विद्यापीठामध्ये जवळपास 4.500 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . मागील काही दिवसांत केवळ काही शेकडो विद्यार्थी भारतात परतले . बाकी सुमारे 4 हजार विद्यार्थी खारकीव्हमध्येच या ठिकाणी अडकले आहेत . असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply