UPSC मध्ये जळगावच्या तिघांनी मारली बाजी. .

शेअर करा.

जळगाव:केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने (UPSC) घेण्यात आलेल्या ८६० निघालेल्या जागांच्या परीक्षांचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून यामध्ये चोपड्यात स्थिती असलेल्या गौरव साळुखे , जळगावचे चार्टर्ड अकाउंटेंट अक्षय साबद्रा आणि भुसावळमधील श्रीराज वाणी या जळगाव जिल्ह्यातील तिघांनी यशाची प्राप्ती केली आहे . केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०२० ला प्रमुख परीक्षा घेण्यात आली होती . या परीक्षेचा रिझल्ट जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आला . यानंतर ऑगस्ट महिन्यात इंटरव्यू घेण्यात आले होते , शुक्रवारी अंतिमचा निकाल जाहीर केला आहे .

 

यात जिल्ह्यामधील चोपडा या ठिकाणचे गौरव साळुखे यांनी देशामध्ये १८२ रैंक प्राप्ती केली आहे .त्याच बरोबर जळगावातील अक्षय साबद्रा यांनी ४८० रैंक व भुसावळचे श्रीराज मधुकर वाणी यांनी देशातून ४३० रैंक मिळविला आहे . यादरम्यान , बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम ठिकाणी अमोल मुरकुट याने परीक्षेत देशातून ४०२ रैंक मिळवून यशाचे शिखर गाठले आहे . यानसोबत आडगाव , जि.नाशिक चे सुदर्शन सोनवणे याने ६ ९ २ रैंक पटकविले आहे . तसेच रवींद्र कुमार यांना देशातून ६ ९ ५ रैंक तर कराड या ठिकाणचे श्रीकांत माधव कुलकर्णी यांनी २५ रैंक प्राप्तझाली आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply