• Tue. Aug 16th, 2022

  yuvraj singh ने केली पुनरागमनाची घोषणा ,युवी मारणार रिएन्ट्री..

  ByKhandeshTimes

  Nov 4, 2021

  नवी दिल्ली : टी -२० विश्वचषकात खराब कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी दिग्गज  yuvraj singh  याने फेब्रुवारीमध्ये क्रिकेट मैदानावर पुनरागमन करत असल्याचा संकेत दिला . युवराजच्या या घोषणेनंतर अनेक जणांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे . डावखुरा स्फोटक फलंदाज युवीने २०१७ ला इंग्लंडविरुद्ध ठोकलेल्या आक्रमक अशा शतकाचा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲप वर पोस्ट केला . परंतु , कोणत्या स्पर्धेद्वारे व संघाकडून उतरणार याबद्दल त्यांने स्पष्ट केले नाही . 4 कर्करोगावर विजय प्राप्त करूण मैदानावर परत आलेल्या युवीने कटक येथे २०१७ ला १२७ चेंडूंत २१ चौकार व तीन षट्कारांसह १५० धावा ठोकल्या होत्या .

  त्याआधी २०११ मधील विश्वचषकाचा तो सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील ठरला होता . युवराजने असे लिहिले कि , चाहत्यांच्या मागणीनुसार मी फेब्रुवारीत मैदानावर परतणार आहे . तुम्ही नेहमी पाठिंबा दर्शविला आहे , हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे . ‘ २००७ ला इंग्लंडचा जबरदस्त वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या सहा चेंडूवर सहा षट्कार मारणाऱ्या युवीने २०१ ९ ला निवृत्तीची घोषणा केलेली होती .

  Leave a Reply

  Your email address will not be published.