
अल्पवयीन विद्यार्थिनी गरोदर; तरुणाला अटक
चोपडा : चोपडा तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २ वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ततरुणालापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीचे पोटदुखत असल्यामुळे तिचला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या वेळी केलेल्या तपासणीत ही मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आली. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून अविनाश वेस्ता पावरा (रा. अंमलवाडी, पो. उमर्टी, ता. चोपडा) याच्याविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार येथून जवळच असलेल्या एका तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी बारावीत शिक्षण घेत असून ती एका वसतिगृहात राहत होती. या मुलीशी अविनाश वेस्ता पावरा याने ओळख केली. त्या ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी त्या तरुणाने पीडितेच्या मैत्रिणीच्या खोलीवर तसेच इतर ठिकाणी अत्याचार केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संशयित अविनाश पावरा याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.नि. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या१७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोपडा येथे २ वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित मुलीचे पोटदुखत असल्यामुळे तिचला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या वेळी केलेल्या तपासणीत ही मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आली. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून अविनाश वेस्ता पावरा (रा. अंमलवाडी, पो. उमर्टी, ता. चोपडा) याच्याविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला
असून या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार येथून जवळच असलेल्या एका तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी बारावीत शिक्षण घेत असून ती एका वसतिगृहात राहत होती. या मुलीशी अविनाश वेस्ता पावरा याने ओळख केली. त्या ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी त्या तरुणाने पीडितेच्या मैत्रिणीच्या खोलीवर तसेच इतर ठिकाणी अत्याचार केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संशयित अविनाश पावरा याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.नि. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.





