खान्देशजळगांवसामाजिक

आपल्यातील क्षमता ओळखून करियर निवडा – डॉ.शिल्पा बेंडाळे

जळगाव ;-महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना ओळखून योग्य त्या क्षेत्रात आपले करियर करावे, असे प्रतिपादन  डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी  केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाचे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . ढोल ताशांच्या गजरात या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे व केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन भारंबे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.दोन दिवस चालणाऱ्या या युवा स्पंदन कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रा नंतर स्नेहसंमेलनाला सुरुवात उत्स्फूर्त काव्यवाचन आणि भाषण या कार्यक्रमाने करण्यात आली, सहभागी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुध्दीमत्ता ,ऑनलाईन शिक्षण प्रणाल, अवयव दान, सोशल मीडियाचा युवकांवर प्रभाव.इ विषयावर काव्यवाचन व भाषणे सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची दाद मिळवली.
प्रा.योगेश महाले, रुपाली साळूखे यांनी परीक्षण केले. विविध छंद व प्रदर्शन या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी
नारी शक्ती, स्त्री भ्रूण हत्या, आत्मंदिर्भर भारत, विषयावर रांगोळ्या लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. सोबतच फुलांच्या रांगोळ्या आयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिकृती नयन मनोहरी ठरत होती. विद्यार्थ्यांनी रंगवलेले वारली पेंटिंग, छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजे, गौतम बुद्ध, मेरा नाम जोकर मधील राज कपूर यांच्या पेंटिंग विशेष दाद देणाऱ्या होत्या. श्री.लीलाधर कोल्हे यांनी विविध छंद प्रदर्शन, कुमोदिनी नारखेडे यांनी  रांगोळी तर प्राजक्ता कोतवाल मेहंदी कला प्रकारांचे परीक्षण केले.हास्य प्रधान खेळ या प्रकारात स्पर्धक विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेत, कार्ड बोर्ड रेस,मटकी फोड, बेडूक उड्या, बॉटल फिलिंग आदी मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तर मुख्य सभागृहात आयोजित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्य संस्कृती वेध खाना खजाना या उपक्रमात खान्देशी भरीत पुरी, चायनीज भेळ, मोमोज, दाल पक्वान्न,भेळ, मोकटेल, चॉकलेट पान  इ.पदार्थांवर विशेष ताव मारला. दुपारच्या सत्रात महाविद्यालयाच्या संगीत विभागाद्वारे गाता रहे  मेरा दिल.. या संगीत मैफिलीत विद्यार्थ्यांनी कजरा मोहबत वाला,  ये समा, कजरा रे, कोई मिलगा, खैईके पान बनारस वाला इ. गाण्यावर ताल धरून कार्यक्रमाचा आनंद लुटला. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता गरबा नृत्य स्पर्धेने झाली.
तर दुसऱ्या दिवशीच्या सत्रात गीत गायन वादन,भारतीय पारंपरिक पोषख स्पर्धा, नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलनात महाविद्यालयाच्या विविध शाखेतील 700 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून, या विविध कला प्रकारात महाविद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचे देखील विशेष सादरीकरण करण्यात येत आहे. महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून विद्यान शाखेतील भाग्यश्री दुसाने निवड करण्यात आली तर प्रणाली नारखेडे विज्ञान शाखा, कृतिका कुलकर्णी वाणिज्य शाखा,उन्नती फुसे कला शाखा तर दर्शना सूर्यवंशी किमान कौशल्य शाखा असे शाखा निहाय प्रिन्सिपल रोल ऑफ ओनर हे किताब सर्वोत्कृष्ट विद्यार्थी जाहीर झाले असून अंतिम पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्याना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे, युवा स्पदन मध्ये प्रा.शोभना कावळे,हया स्नेहसंमेलनाच्या प्रमुख असून त्यांना महाविद्यालयाच्या उपप्राचार्य करुणा सपकाळे पर्यवेक्षक राजेंद्र ठाकरे समन्वयक स्वाती बराटे, उमेश पाटील व महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button