खान्देशगुन्हेजळगांव

पाचोरा तालुक्यातील १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

पाचोरा;- तालुक्यातील एका गावातील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडतेस आले असून या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्ष आठ महिन्याच्या मुलीला ५ऑगस्ट च्या रात्री दहा ते सहा ऑगस्टच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान संशयित पवन नंदलाल कुमावत रा. भातखंडे तालुका पाचोरा याने मुलीला कुठले तरी अमिश दाखवून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने 7 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनला दिल्यावरून संशयित पवन कुमावत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वसावे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button