खान्देशजळगांवसामाजिक

मनियार बिरादरीची २७ वी वार्षिक सभा उत्साहात पार; १५ ठराव मंजूर

जळगाव: जळगाव जिल्हा मनियार बिरादरीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुक्ताईनगर येथील अक्सा हॉलमध्ये अध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत विविध १५ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या सभेला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन संस्थेचे सचिव अजिज सर यांनी केले.

हॉल बांधकामासह विविध विषयांवर चर्चा

या बैठकीत मागील वर्षातील कामकाजाला मंजुरी देण्यात आली, तसेच वार्षिक अहवाल व हिशोबपत्रकावर चर्चा झाली. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी अनेक योजनांवर विचारविनिमय करण्यात आला. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जळगाव शहरात सर्व सोयींनी युक्त असा एक हॉल बांधण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायावर गंभीर चर्चा

या सभेत मुस्लिम समाजावर होणारा अन्याय आणि खोटे गुन्हे दाखल होण्याच्या वाढत्या घटनांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. यावर एकमताने खालील ठराव मंजूर करण्यात आले:

  • मुस्लिम समाज कायद्याच्या चौकटीत राहून शांतता, बंधुता आणि सलोखा राखण्यास कटिबद्ध आहे.
  • प्रशासन आणि पोलिसांनी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची खात्री द्यावी.
  • अफवा, द्वेषपूर्ण भाषणे आणि सोशल मीडियावरील भडकाऊ संदेशांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.
  • मुस्लिम नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्यास त्यांची निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्यात यावा.

हे ठराव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य अल्पसंख्याक आयोग आणि मानवाधिकार आयोगाला सादर करण्यात येणार आहेत. समाजाने या बैठकीत ऐक्य आणि शांतता टिकवून ठेवण्याचा निर्धार केला असून, प्रशासनाकडून समान न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

या सभेच्या यशस्वीतेसाठी मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, अहमद ठेकेदार, कलीम मणियार, मुशीर मणियार, अकील मणियार आणि जळगावचे रऊफ टेलर, अल्ताफ शेख, अख्तर शेख, रईस टिल्या, कासिम उमर आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button