नेहरू युवा केंद्र जिल्हा सल्लागार समिती बैठक
जळगाव, :- नेहरू युवा केंद्राने जिल्ह्यात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घ्यावे. अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी आज येथे दिल्या.
जळगाव नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा सल्लागार समितीची मासिक आढावा बैठक निवासी उपजिल्हाधकिारी श्री.कासार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र, नेहरू युवा केंद्राचे सोमनाथ बिऱ्हाडे, संदीप कुमार, किशोर प्रल्हाद चौधरी, डॉ. राजेश सुरळकर, अजिंक्य गवळी, प्रणिल चौधरी, तेजस पाटील, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोहन अवचरे, चेतन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२३ मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल सादर केला.
श्री.कासार म्हणााले, केंद्र शासनाच्या महाभारत पोर्टलवर नोंदणी वाढविण्यात यावी. अॅनिमिया चाचणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावी. नव मतदारांची ९ डिसेंबरच्या आत मतदार नोंदणी करण्यात यावी. राज्यात मतदार नोंदणी बालविवाह प्रतिबंध जनजागृती मोहीम आणि युवा संमेलने आयोजित करण्यात यावेत. तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. जिल्हा उद्योग अधिकारी व समाजकल्याण यांसारख्या इतर विकासात्मक विभागांशी समन्वय साधण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री.कासार यांनी यावेळी केल्या.