
जळगाव: येथील वंदना पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) मध्ये इतिहास विषयात यश मिळवून सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली ही पात्रता परीक्षा (SET) वंदना पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. त्यांना पहिल्या पेपरमध्ये ८४ गुण तर दुसऱ्या पेपरमध्ये १२८ गुण असे एकूण २१२ गुण मिळाले आहेत.
वंदना पाटील यांच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षकांनी आनंद व्यक्त केला असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





