
जमीयत उलेमा-ए-हिंद, जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर
मौलाना नूर मोहम्मद इशाती अध्यक्ष, रागीब अहमद सरचिटणीस
भुसावळ – जमीयत उलेमा-ए-हिंद महाराष्ट्रचे सदर हाफिज नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ येथे जळगाव जिल्हा जमीयत उलेमा-ए-हिंदची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या निवडीत मौलाना नूर मोहम्मद इशाती यांची अध्यक्षपदी तर रागीब अहमद यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. तसेच नायब सदर म्हणून मौलाना इमरान (जामनेर) व अनीस किफायती (भुसावळ), सचिवपदी हाजी अल्ताफ शेख (भडगाव) आणि मौलाना फिरोज उरुजी (बोदवड), तर खजिनदारपदी कारी जाहिर (भुसावळ) यांची निवड झाली. याशिवाय ३१ सदस्यांची कार्यकारिणीत निवड झाली आहे.
या वेळी जमीयत उलेमा-ए-हिंद महाराष्ट्रचे कन्व्हीनर मायना शफीक साहेब व मौलाना अहद मिल्ली उपस्थित होते. १०८ वर्षांची परंपरा असलेली जमीयत उलेमा-ए-हिंद ही उलेमांची संघटना असून, स्वातंत्र्य संग्रामातही या संघटनेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याचे सांगण्यात आले.





