
चिनावल येथे महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे थाटात उद्घाटन
सावदा, (प्रतिनिधी: शेख मुख्तार) चिनावल (ता. रावेर) येथे रविवारी सकाळी 10:30 वाजता महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उद्घाटन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) विशाल पाटील यांच्या हस्ते आणि चिनावलच्या लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 32 गावांपैकी स्वतंत्र तंटामुक्ती कार्यालय स्थापन करणारी चिनावल ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
या उद्घाटन सोहळ्याला महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जितेंद्र नेमाडे, पोलीस पाटील नीलेश नेमाडे, माजी जि.प. सदस्य तनुजा श्रीकांत सरोदे, माजी जि.प. सदस्य पुष्पा तायडे, उपसरपंच शाहीनबी शेख जाबीर, माजी सरपंच भावना योगेश बोरोले, माजी जि.प. सदस्य सुरेखा पाटील, माजी पं.स. सभापती माधुरी नेमाडे, माजी पं.स. सदस्य गोपाळ नेमाडे, माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे, योगेश बोरोले, उज्वला भंगाळे, सुरेश गारसे, दामोदर महाजन, ठकसेन पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दीपक बंडू कोळी, गावातील गणेश मंडळे, दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (कर्तव्यदक्ष) विशाल पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराचे कौतुक करताना गावातील किरकोळ वाद-विवाद तंटामुक्ती कार्यालयातच सोडवले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, समितीचे अध्यक्ष जितेंद्र नेमाडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, बिट अंमलदार विनोद पाटील, सुनील जोशी, मझहर पठाण, नीलेश बावीस्कर, राजेश बोदडे, मयूर पाटील, राहुल येवले आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
चिनावल ग्रामपंचायतीच्या या अभिमानास्पद उपक्रमामुळे गावातील शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, यामुळे स्थानिक पातळीवर त्वरित आणि प्रभावी तंटानिवारण शक्य होणार आहे





