खान्देशजळगांवसामाजिक

गणेश विसर्जनामुळे शनिवारीचे आठवडे बाजार रद्द

जळगाव: जिल्ह्यात ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी असल्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघणार आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (६ सप्टेंबर) भरणारे सर्व आठवडे बाजार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

हे बाजार दुसऱ्या सोयीस्कर दिवशी भरवता येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना आणि प्रशासनालाही सोयीचे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button